मंचर येथील वृंदावन सोसायटी रस्ता क्रॉंक्रेटिकरणाचे भूमिपूजन संपन्न…

मंचर,दि.29/06/2021
बातमी : प्रतिनिधी अमर कराळे, मंचर

मंचर येथील वार्ड क्र.५ मधील जुना चांडोली रोड लगत असणाऱ्या वृंदावन सोसायटीच्या रस्ता काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन आज पार पडले. बऱ्याच दिवसांपासून वृंदावन सोसायटीतील नागरिकांची सदर रस्त्याबाबत ची मागणी होती. याबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य श्री.संदीप (लक्ष्मण) थोरात भक्ते यांनी आपण दिलेल्या आश्वासनाची आज पूर्ती झाल्याचे सांगून सदर रस्ता हा मा.श्री.दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाला असल्याचे सांगितले या उदघाटन प्रसंगी उपस्थित असलेले भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.बाळासाहेब बेंडे यांनी वृंदावन सोसायटी ही मंचर मधील एक जुनी गृहनिर्माण सोसायटी असून येथील रोड चा प्रलंबित प्रश्न या ५ नंबर वार्ड चे माजी सदस्य संदीप (लक्ष्मण) थोरात तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ.पल्लवी थोरात व सौ.ज्योती थोरात यांच्या पाठपुराव्याने २५/१५ या योजने अंतर्गत मा. दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होऊन हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगून रस्त्याचे काम चांगल्या प्रतीचे करण्याची सूचनाही यावेळी उपस्थित कॉन्ट्रॅक्टर ला केली यावेळी वृंदावन सोसायटी मधील नागरिकांच्यावतीने मा. दिलीपराव वळसे पाटील यांचे विशेष आभार मानून उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सौ.अरुणा थोरात, ग्रामपंचायत सदस्या सौ.माणिक गावडे, सौ.ज्योती थोरात, सौ.पल्लवी थोरात-भक्ते पा., सौ.ज्योती निघोट, अरुण लोंढे, बाळासाहेब खानदेशे, जे.के थोरात, राजेंद्र थोरात,सुहास बाणखेले, जगदीश घिसे, गणेश खानदेशे, राहुल पडवळ, बाजीराव मोरडे,अविनाश शेटे,काँट्रॅक्टर मयूर मोरडे व सोसायटी मधील नागरिक उपस्थित होते.
