पदाधिका-यांच्या कामातूनच संघटनेची ओळख निर्माण होते – वसंत मुंडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विभागीय व जिल्हाध्यक्षांच्या कामकाजाची आढावा बैठक उत्साहात

कैलास बोडके
पत्रकार
०६ ऑक्टोबर २०२१

औरंगाबाद

हवा दिसत नाही पण ती असते संघटनेचे कामही तसेच असते. त्यामुळे काम करत रहा, कामातून प्रभाव तयार होतो आणि पदाधिका-यांनी संघटनेसाठी केलेल्या कामातूनच संघटनेची ओळख निर्माण होते ,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या औरंगाबादेतील विभागीय कार्यालयात पत्रकार संघाच्या विभागीय व जिल्हाध्यक्षांच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर राज्य सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांची उपस्थिती होती. बैठकीचा शुभारंभ बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व कोरोनातील शहीद पत्रकारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका अध्यक्ष नीळकंठ मोहिते यांनी यामध्ये एक कोटी रुपयांचा किराणा गोरगरिबांना वितरण केला

यावेळी पुढे बोलताना वसंत मुंडे म्हणाले की,कोरोनाच्या काळात 106 पत्रकारांचा मृत्यू झाला. सरकारने एकाही पत्रकाराला मदत केली नाही. पण आपण, राज्य पत्रकार संघाने तात्काळ मदत केली .हा राज्यातील एकमेव पत्रकार संघ आहे जो कायम पत्रकारांच्या पाठिशी राहतो. त्यामुळे तुम्ही आपल्या भागात संघटना जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी जाईल, या दृष्टिकोनातून काम करा.संघटनेत काम करताना संपर्क फार महत्त्वाचा आहे. त्यासाठी यापुढे विभागात व जिल्ह्य़ात मेळावे,बैठका घ्या. जिल्ह्य़ातील ज्येष्ठ पत्रकारांना सोबत घ्या, त्यांचे मार्गदर्शन घेऊन विविध समाजउपयोगी उपक्रम राबवा म्हणजे लोक जोडल्या जातील.त्यामूळे संघटना वाढेल व आपलीही ताकद वाढेल. हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. 20 वर्षांपूर्वी मी या संघटनेत शहर सचिव म्हणून प्रवेश केला.आज राज्याचा अध्यक्ष आहे.हा प्रवास करताना मी संघटना वाढवत गेलो आणि सोबत मी वाढलो,असे सांगून मुंडे यांनी पदाधिकाऱ्यांना संघटनेसाठी झोकून देऊन काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विश्वास आरोटे म्हणाले की, संघटनात्मक कार्य करताना शिस्त महत्त्वाची आहे.त्यामुळेच अनेक वेळा काही निर्णय घेताना कुणाचे मन दुखावल्या जाते. तेव्हा संबंधितांनी एक लक्षात घेतले पाहिजे की,कुठलाही निर्णय एकट्याचा नसतो.तो कोअर कमिटी घेत असते.तेव्हा संघटनेचे हीत डोळ्यासमोर ठेवले जाते.त्यामूळे संघटनेपेक्षा कोणीही महत्वाचा नसतो आणि आपण हे लक्षात घेऊन काम करत आहोत म्हणूनच आज आपली संघटना वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वेगाने प्रगती करत आहे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका अध्यक्ष नीळकंठ मोहिते यांनी यामध्ये एक कोटी रुपयांचा किराणा गोरगरिबांना वितरण केला तर नगर जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील पत्रकारांनी या काळामध्ये मोठे काम केले पत्रकारांकडे समाजाचा दृष्टिकोन पाहण्याचा वेगळा असला तरी राज्य पत्रकार संघ आणि समाजोपयोगी उपक्रम राबवले यामुळे राज्य पत्रकार संघाची ओळख सर्वसामान्य माणसांमध्ये वेगळ्या प्रकारे झाली आहे अतिवृष्टीमुळे कोकण विभागातील रायगड महाड रत्नागिरी ठाणेया जिल्ह्यांमध्ये फास्ट ट्रक साहित्य वितरण करण्यात आले राज्य पत्रकार संघ 365 दिवसांपैकी 265 दिवस विविध उपक्रम राबवून सर्वसामान्य नागरिकांना पत्रकार संघाची वेगळ्या प्रकारे करून देत आहे कोरोना काळामध्ये दिवंगत पत्रकार यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचे काम या पत्रकार संघाने केले आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेवून प्रत्येक पत्रकार हा समाज उपयोगी काम करत आहे असे शेवटी आरोटे म्हणाले.

या बैठकीला विभागीय अध्यक्ष- वैभव स्वामी, बाळासाहेब देशमुख, प्रा.महेश पानसे, सिद्धार्थ तायडे, जिल्हाध्यक्ष, नयन मोंढे, यवतमाळ उदय नवाडे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अनिल रहाणे अनिरुद्ध एस. उगले, दिलीप कोठावडे, प्रमोद पाणबुडे,अनिल गावंडे, बाजीराव फराकटे, अशोक देडे, सुधाकर फुले, दिगंबर गुजर, धनंजय पाटील, सुनील फुलारी, कुंडलिक वाळेकर, सुनिल बुकडे, इरफान खान, प्रदीप शेंडे, गजानन देशमुख, शरद नागदेवे, डॉ. प्रभू गोरे, , शांताराम मगर, राजेश खोकडे, अनिल राहणे,विलास शिंगी,मुकेश मुंदडा,छबुराव ताके,मनोज पाटणी,दिपक मस्के,अभय विखणकर,शिवाजी गायकवाड, संजय व्यापारी ,दिपक काकडे .गौरव मैड आदिंची उपस्थिती होती.विभागीय व जिल्हाध्यक्षांनी आपल्या कार्याचा अहवाल प्रदेशाध्यक्ष वसंतजी मुंडे यांच्याकडे सादर केला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्नेहा साळवे हिने केले.

चौकट… महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नाशिक शहराध्यक्ष दिलीप कोठावदे यांनी 127 वेळा रक्तदान करून जागतिक विक्रम केला. प्रदेशाध्यक्ष वसंतजी मुंडे यांनी यावेळी त्यांच्य विशेष सत्कार केला.तसेच आपल्यासारख्या पदाधिकाऱ्यांचा संघटनेला अभिमान आहे,असे गौरवोद्गार काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *