शिक्षक दिनानिमित्त महाविद्यालयातील शिक्षकांचा सत्कार संपन्न…


घोडेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी

घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवकांचा शिक्षक दिनानिमित्ताने संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री.सुरेशशेठ काळे हे होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा.अॕड.संजय आर्विकर यांनी आॕनलाईन शिक्षणापेक्षा वर्गातील शिक्षण महत्वाचे आहे. आॕनलाईन हा एक शिक्षणाचा पर्याय आहे.त्यातून खरे शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाही.

वर्गातील अध्यापनातूनच आदर्श संस्कार, प्रगल्भ व्यक्तिमत्त्व, वैचारिकता, संस्कृतीची ओळख, वक्तशीरपणा व शिस्त इ.विद्यार्थी आत्मसात करू शकतो. वर्गातील पूर्ववत अध्ययन व अध्यापन प्रक्रिया चालू व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करून उपस्थित शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.प्रमुख उपस्थिती म्हणून अॕड.मुकूंद काळे म्हणाले की,शिक्षक हा देव असतो.देवाला काय वेदना होतात हे कळू शकत नाही.परंतु शिक्षकांच्या वेदना सहह्दयपणे समजून घेता येतात.याप्रसंगी त्यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना अभिवादन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव, प्रा.डॉ.प्रभाकर मोकळ,प्रोफेसर डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर,प्रा.स्वप्निल डोके, प्रा.अमोल दप्तरे,अधिक्षक श्री.अशोक काळे,वरिष्ठ लिपिक श्री.गणेश काळे इ.नी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष मा.शिवाजी घोडेकर, न्यू इंग्लिश मिडियम स्कूलचे चेअरमन मा.अजित काळे, खजिनदार मा.शिवदास काळे, संचालक मा.सोपान काळे,माजी उपप्राचार्य प्रा.भागवत पवार इ.मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. वल्लभ करंदीकर यांनी तर सुत्रसंचालन प्रा.डॉ.चांगुणा कदम यांनी केले.प्रा.विश्वास कोकणे यांनी आभार मानले.याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *