ओझर येथील श्रींचा जन्मोत्सव सोहळा होत आहे साध्या पद्धतीने साजरा…

ओझर प्रतिनिधी :- मंगेश शेळके

दि.८ ऑगस्ट २०२१ (ओझर ) :- श्रीगणेश जन्मोत्सव सोहळ्या निमित्त अष्टविनायकातील मुख्य स्थान श्री क्षेत्र ओझर नगरी श्री विघ्नहराच्या जन्मत्सोव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.जन्मोत्सव सोहळा कोरना रोगाचे संक्रमण असल्याने शासकीय नियमांचे पालन करून श्री क्षेत्र ओझर येथे संपन्न होत आहे अशी माहिती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष श्री गणेशभाऊ कवडे यांनी दिली.


पहाटे ५.०० श्री विघ्नहराची महापूजा करून धार्मिक विधी करण्यात आले.सकाळी ठीक ७.०० वा श्रींची महाआरती करण्यात आली. ठीक ९.३० वा मोरया गोसावी यांच्या पदांचे गायन करून देवस्थान ट्रस्ट च्या वाहनामधून अध्यक्ष व विश्वस्त,कर्मचारी वृंद यांच्या समवेत दुसरा दक्षिणद्वार धनेगाव या ठिकाणी करून उमा –महेश पूजा करून संपन्न झाला.
सालाबादप्रमाणे आसराई मातेला आपल्या जन्माचे आमंत्रण देण्यात आले. गणेश जन्मोत्सवा निम्मित मंदिरात रांगोळी, स्वच्छता,श्रींच्या मूर्तीला आकर्षक फुलांची सजावट मंदिराला विद्युत रोषणाई, इत्यादी मोठ्या प्रमाणात करण्यात आली .

सर्व ग्रामस्थ ,भाविक यांना देवस्थान ट्रस्ट कोरोनाच्या महामारीत गर्दी करू नका सोशल डीस्टस्टिंगचे पालन करा, सेनीटायझर , मास्क जवळ बाळगा असे आवाहन करण्यात आले होते त्याचे काटेकोर पणे पालन ग्रामस्थ व भाविक यांनी केलेले पाहायला मिळाले . इंटरनेट द्वारे मोबाईल मध्ये थेट प्रेक्षपण पाहता येत होते अशी व्यवस्था देवस्थान ट्रस्ट ने केलेली होती अशी माहिती अध्यक्ष श्री गणेशभाऊ जगन्नाथ कवडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *