शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी…

 

नागरीकांना तात्काळ मदतीची मनपा अधिकाऱ्यांना केल्या सुचना…

औरंगाबाद प्रतिनीधी
दि.०८\०९\२०२१

मंगळवारी रात्री शहरात झालेल्या ढग फुटीमुळे अनेक भागात पाणी शिरल्याने नागरीकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची आज शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पाहणी करुन नागरीकांना दिलासा देत तात्काळ मदतीची मनपा अधिकाऱ्यांना सुचना केली.
यावेळी विटखेडा, उल्कानगरी, खिंवसरा पार्क विद्यानगर, बाळकृष्णनगर, गुलमंडी, पैठणगेट, दलालवाडी, औरंगपुरा नाला, औषधी भवन नाला आदी भागात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.


नुकसानग्रस्त झालेल्या दुकानांचे, घरांचे पंचनामे करुन नुकसान ग्रस्तांना तात्काळ मदत मिळवण्यासाठी सरकारकडे मागणी करणार असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगीतले…
यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, माजी आमदार किशनचंद तनवाणी, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, माजी महापौर कला ओझा, माजी उपमहापौर स्मिता घोगरे, नितीन घोगरे, शहर अभियंता सखाराम पानझडे, उपअभियंता फालक, माजी नगरसेवक सचिन खैरे, सुरेंद्र कुलकर्णी, अजय चावरीया, व्यापारी महासंघाचे अजय शहा, लक्ष्मीनारायण राठी, विजय जैस्वाल, राजेश शिंदे, विनोद माने, पांडुरंग पाटील, अविनाश खिल्लारे आदी उपस्थिती होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *