ओझर येथील वृध्द दांपत्याला मारहाण करून जबरी चोरी करणारी टोळी २४ तासात अटक स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी…

         ओतूर पोस्टे गु.र.नं ३७९/२०२१ भादवि कलम ३९४ नुसार दिनांक २६/८/२०२१ रोजी गुन्हा दाखल झाला होता.फिर्यादी नामे शांताबाई बळवंत कवडे वय ७२ रा.ओझर ता. जुन्नर जि. पुणे यांनी फिर्याद दिली की दि.२५/८/२०२१ रोजी रात्री ९.३० ते १० च्या दरम्यान फिर्यादी यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून त्यांना व त्यांच्या पतीला मारहाण करून फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले अश्या आशयाची फिर्याद दिली. सदर चा गुन्हा हा भरवस्तीत झाल्याने व अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याच्या सूचना मा. पोलीस अधीक्षक श्री. अभिनव देशमुख सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.
           सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असता गोपनीय बातमीदारा मार्फत गुन्हे शाखेच्या पथकाला बातमी मिळाली की गुन्हा घडले ठिकाणी शेजारी राहणारा इसम नामे *समीर पवन सोनवणे* हा गुन्हा घडले पासून त्या परिसरात दिसला नाही तसेच गुन्हा घडण्याच्या काही दिवस आधी तो अनोळखी इमसांसोबत फिरत होता. त्याच्या विषयी अधिक माहिती घेतली असता त्याचे काही मित्र हे नगर जिल्ह्यातील पाथर्डी परिसरातील असल्याचे समजले. अधिक माहितीच्या आधारे समीर सोनवणे हा आज त्याच्या दोन

साथीदारांसह मु.पो. आणे, ता. जुन्नर जि. पुणे येथे येणार असल्याचे समजले लागलीच त्या ठिकाणी सापळा लावून गुन्हे शाखेने समीर सोनवणे व त्याच्या इतर दोन साथीदार (विधी संघर्षित बालकांना) यांना पाटलाग करून ताब्यात घेतले.
      समीर सोनवणे याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने इसम नामे *पावलस कचरू गायकवाड रा. खरवंडी, ता. पाथर्डी, जि.अ.नगर* याच्या सांगण्या वरून व त्याने पाठवलेल्या साथीदारांना गुन्हा करण्याच्या ठिकाणची संपूर्ण माहिती समक्ष ओझर गावात फिरून दिली व त्यांच्या मदतीने हा जबरी चोरीचा प्रकार केल्याची कबुली दिली. पावलस गायकवाड हा नगर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी, दरोडे सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
    सदर आरोपींची वैदकीय तपासणी करून पुढील कार्यवाही करीता ओतूर पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.
  *सदरची कारवाई*
मा.पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख साो.  मा. अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, यांच्या सूचनेनुसार  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक
श्री अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली
स.पो.नि. नेताजी गंधारे                                        पो.हवा. हनुमंत पासलकर
पो.हवा. विक्रम तापकिर
पो.हवा. दिपक साबळे
पो.हवा. राजू मोमीन
पो.ना. संदिप वारे
पो.कॉ. अक्षय नवले
पो.कॉ प्रसन्न घाडगे
पो.कॉ. दगडू वीरकर
                     यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *