सीमा सावळे, ममता गायकवाड, विलास मडेगिरी, संतोष लोंढे या पिं चिं.मनपा च्या माजी स्थायी समिती अध्यक्षांच्या व आत्ताचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या मालमत्तेची चौकशी करावी- बाळासाहेब बबन वाघेरे यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी – दि २८ ऑगस्ट २०२१
पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०१७ च्या निवडणुकीत भाजपची एक हाती सत्ता आली आणि पहिल्या स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे झाल्या, त्यानंतर खऱ्या अर्थाने महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू झाला ठेकेदारांकडून जास्त प्रमाणात टक्केवारी मागितली जाऊ लागली. काही ठेकेदारांकडून भागीदारी घेण्यात आली याची तक्रार त्यावेळेस प्रमोद साठे नामक व्यक्तीने थेट पंतप्रधान कार्यालयात केली. यांच्या वर्तमानपत्रात बातम्या आल्या मात्र केंद्रात राज्यात व महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने चौकशी झाली नाही. त्यामुळे महापालिकेत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला.

आज २०१७ ला का भाजपच्या पापाचा घडा भरला व लाच घेताना स्थायी समितीचा लिपिक पकडला गेला. स्थायी समितीचे अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांना अटक झाली त्यामुळे स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष सीमा सावळे, ममता गायकवाड, विलास मेडेगिरी, संतोष लोंढे व विद्यमान अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांच्या संपत्तीची त्यांच्या कुटुंबाची व निकटवर्तीयांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करा व योग्य ती कारवाई करा.

२०१७ च्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्र भरताना स्थायी समिती अध्यक्षांनी संपत्तीचा लेखाजोखा दिला आहे त्यानंतर संपत्तीत किती बेहिशोबी मालमत्ता झाली त्यांच्या कुटुंबाच्या व निकटवर्तीय नातेवाईक यांच्या संपत्तीची चौकशी करावी. असे आढळल्यास योग्य ती कारवाई करावी. असे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *