प्रदेश काँग्रेस च्या चिटणीस पदी सचिन साठे व गौतम अरकडे यांची निवड…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि. २७ ऑगस्ट २०२१
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या नवनिर्वाचित जम्बो कार्यकारिणी मध्ये पिंपरी चिंचवड शहरातून सचिन साठे व गौतम अरकडे यांची चिटणीस या पदावर नुकतिच निवड जाहीर करण्यात आली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस च्या मान्यतेने प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी ची यादी कालच जाहीर करण्यात आली यामध्ये
१८ उपाध्यक्ष, १ खजिनदार, ६५ सरचिटणीस, १०४ चिटणीस, ६ प्रवक्ते, १४ सदस्यीय कार्यकारी समिती, ७ वरिष्ठ सदस्यीय कार्यकारी समिती, ५ सदस्यीय शिस्तपालन समिती अशी एकूण २२० जणांची राज्यस्तरीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस समिती चे सरचिटणीस खा.के.सी.वेणूगोपाल यांनी या निवडी पत्राद्वारे जाहीर केल्या आहेत.

सर्व समावेशक अशी व सुमारे ४८ जाती- जमातींना प्रतिनिधीत्व देत काँग्रेस ने सामाजिक समतोल साधला आहे व या कार्यकारिणी तील निवडीमुळे पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये विशेषत: पिपरी चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे न आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेस पक्षाने जून्या व निष्ठावंताना न्याय दिल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

सचिन साठे यांनी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस चे अध्यक्ष म्हणून काम केले आहे तर गौतम अरकडे यांनी काँग्रेस च्या मागासवर्गीय विभागाचे राज्य कार्याध्यक्ष या पदावर काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *