बेल्हे येथील जवानाचे अपघाती निधन: शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…

बेल्हे दि.१४ (विभागीय संपादक रामदास सांगळे):-
 अज्ञात वाहणाने धडक दिल्याने आळे लवणवाडी (ता.जुन्नर) या ठिकाणी सि आर पी एफ च्या एका जवानाचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार (दि.१३) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. 
     याबाबत आळेफाटा पोलिस स्टेशन कडुन मिळालेल्या माहितीनुसार बेल्हे (ता.जुन्नर) येथील संजय रंगनाथ पोपळघट हे तळेगाव येथील सि.आर.पी.एफ च्या युनिट मध्ये ड्युटीवर असुन ते काही कामा निमीत्ताने गावी आले होते. शनिवारी परत ड्युटीवर आपल्या मोटार सायकल वरून  जात असताना नगर कल्याण मार्गावरील लवणवाडी या ठिकाणी आले असता अज्ञात वाहणाने त्यांना जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.या बाबतची फिर्याद संतोष पोपळघट यांनी दिली असुन या अपघाताचा पुढील तपास आळेफाटा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकास लोंढे करत आहे. 
    दरम्यान संजय पोपळघट  हे सि.आर पी एफ मध्ये असल्याने तसेच ते काल ड्युटीवर जात असताना त्यांना अपघात झाल्याने त्यांना सि आर पी एफ च्या वतीने तसेच आळेफाटा पोलिस स्टेशन च्या वतीने मानवंदना देण्यात आली. बेल्हे येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.पोपळघट यांच्या मृत्यूने बेल्हे गावावर शोककळा पसरली असून अंत्यविधी वेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते.