आळेच्या बाळासाहेब जाधव महाविद्यालयाला NAAC कडून B+ मानांकन…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.19/8/2021

आळेच्या बाळासाहेब जाधव महाविद्यालयाला NAAC कडून B+ मानांकन

बातमी:-रामदास सांगळे,विभागीय संपादक जुन्नर

आळेफाटा :- आळे (ता.जुन्नर) येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेकडून (NAAC) नामांकन मिळाले असल्याची माहिती समन्वयक डॉ.अरुण गुळवे यांनी दिली. शैक्षणिक वर्ष २०१४-१५ ते शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या कालावधीत महाविद्यालयाचे वेगवेगळ्या निकषांवर आधारित सदर टीम कडून परीक्षण करण्यात आले. या समितीने महाविद्यालयातील विविध विभाग, अध्ययन अध्यापन पध्दती, संशोधन कार्य, कला-क्रीडा क्षेत्रातील महाविद्यालयाची
कामगिरीची, ग्रंथालय ,परीक्षा पद्धती, आदी बाबींची पाहणी केली.

तसेच आजी-माजी विद्यार्थी, पालक, विभागप्रमुख, संस्था पदाधिकारी यांच्याशी समक्ष चर्चा केली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता तसेच वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची नोंद घेऊन नॅक पियर टीमने महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्तेचे मूल्यमापन केले. महाविद्यालयाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. उच्च शिक्षणातील आव्हाने लक्षात घेऊन महाविद्यायास काही सुधारणाही सुचविल्या .या टीम मध्ये बेरहमपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.बिजयकुमार साहू , हैद्राबाद येथील इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ.थारकेश्वर व्ही.बी. व तामिळ नाडू येथील मरूधर केसरी जैन महाविद्यालयाचे प्राचार्य , डॉ.एम. सेंथिलराज होते. या संपूर्ण परिक्षणात महाविद्यालय मागील B ग्रेड वरून ” B+ ” ग्रेड मिळविण्यात यशस्वी झाले.

या परीक्षणासाठी संस्थेचे अध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे , सर्व संचालक मंडळ व संस्थेचे सर्व सभासद यांचे विशेष सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रविण जाधव व समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळणारे डॉ. अरुण गुळवे यांचे अथक प्रयत्न महाविद्यालयास ” B +” नामांकन मिळविण्यास फायदेशीर ठरले. महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख , सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक ,सरपंच ,उपसरपंच,ग्रामस्थ व संस्थेवर प्रेम करणारे सर्व ज्ञात अज्ञात हितचिंतक या सर्वांचा या मूल्यांकनामध्ये सिंहाचा वाटा आहे ,असे प्रतिपादन ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे यांनी आपल्या अभिनंदनपर मनोगतात व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *