आमदार बंधू शंकर जगताप यांच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ल्या प्रकरणी सांगवी पोलीस चौकीवर निषेध मोर्चा

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२४ नोव्हेंबर २०२१

सांगवी


चिंचवड चे आमदार लक्ष्मण जगताप यांचे छोटे बंधू माजी नगरसेवक उद्योजक शंकर जगताप यांच्या कार्यालयावर मंगळवार (दि २३ नोव्हेंबर) रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी मोटारसायकल वर येऊन पेट्रोल बॉम्ब टाकून हल्ला केला. व पळून गेले पण अस्पष्ट CCTV कॅमेऱ्यात कैद झाले. पेट्रोल बॉम्ब त्यातही डीपी जवळ पडल्याने नशीब त्यात कोण्हीही जखमी झाले नसून मोठा धोका टळला. घटनेनंतर मोठा पोलीस फौजफाटा तेथे जमा झाला व पोलीस पुढील तपास करत आहेत.

शंकर जगताप यांच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला
शंकर जगताप यांच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला

या घटनेचा निषेध करण्यासाठी व हल्लेखोरांना शोधून तात्काळ शिक्षा करण्यात यावी यासाठी सकाळी ११ वाजता सांगवी पोलीस चौकीत निवेदन देण्यासाठी भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व युवा मोर्चा तसेच प्रत्येक आघाडीतील सर्वाना सृष्टी चौक पिंपळे गुरव येथे उपस्थितीत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *