लाचलुचपत विभागाच्या कारवाईचे स्वागत तक्रारदार ठेकेदारास संरक्षण दिल्यास अनेक प्रकरणे पुढे येतील :- बाबा कांबळे

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी दि १९ ऑगस्ट २०२१
पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये स्थायी समिती कार्यालयामध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. टक्केवारी आणि कमिशन घेण्यासाठी स्थायी समिती प्रसिद्ध असून स्थायी समिती सदस्य आणि अध्यक्ष होण्यासाठी चढाओढ लागत असते, परंतु लोकप्रतिनिधी वरती कारवाई होत नाही यापूर्वी आम्ही सुराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने तत्कालीन मोरवाडीचे नगरसेवक यांस व आरोग्य अधिकारी यांनी लाच मागितल्याप्रकरणी अँटी करप्शन विभागास कळवून धाड टाकून आटक केले होते, या प्रकरणी प्रल्हाद कांबळे , यांनी फिर्याद दिली होती,

त्या काळी आम्ही धाडस करून साफसफाई कामात लाच मागणाऱ्या नगरसेवकांस अटक करण्याचे धाडस दाखवले होते त्याबद्दल अँटी करप्शन विभागाकडे तक्रार करण्यात आली होती, केलेल्या तक्रारीवर ठाम राहिल्यामुळे संबंधित नगरसेवकास शिक्षा देखील झालेली आहे , साफसफाईच्या कामांमध्ये लाच मागितली म्हणून आम्ही कारवाई केली होती ,

परंतु त्यानंतर मात्र ज्या संस्थेने तक्रार दिली त्या स्वराज्य स्वयंरोजगार सहकारी संस्थेस अघोषित बंदी घालून या संस्थेचे सर्व कामे काढून घेण्यात आले व त्यांना नवीन कोणतेही काम देण्यात आले नाही , असेच अनुभव तक्रार करणाऱ्या संबंधित ठेकेदार यांचे आहेत. ठेकेदारांनी तक्रार केल्यास त्यांना घोषित पणे बंदी घालून त्यांना पुढील काम देण्यात येत नाहीत व दिलेले कामे काढून घेतली जात आहेत, अश्या प्रकरणामुळे ठेकेदार व संबंधित संस्था पुढे येऊन तक्रार करत नाहीत, यामुळे अधिकारी, नगरसेवक , व ठेकेदार संगणमत करून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करून महानगरपालिका व करदात्यांची लूट करत आहे, बर्‍याच कालावधीनंतर लोकप्रतिनिधीला अटक करण्यात आली असून ज्या ठेकेदार संस्थेने तक्रार दिली आहे त्याच्या पाठीशी उभे राहिल्यास पुढील काळात देखील भ्रष्टाचाराला पायबंद बसू शकतो व नगरसेवक आणि भ्रष्ट अधिकारी यांच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीला चाप बसू शकतो.

शहरातील नागरिकांनी जागृत राहून अशाप्रकारे वारंवार तक्रार देण्यासाठी पुढे आले पाहिजे असे मत कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष ” कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, यांनी याप्रसंगी व्यक्त केले आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *