नारायणगांव कोविड सेंटर ला खुर्ची सम्राट व्हाँट्सएप ग्रूपच्या वतीने “हाय ऑक्सीजन” मशीन भेट

नारायणगांव :- (किरण वाजगे), नारायणगाव येथील कोविड सेंटरला सुमारे पावनेदोन लाख रुपये खर्चाचे “हाय ऑक्सीजन नोझल” मशीन “खुर्चीसम्राट” या व्हाँट्सएप ग्रुपच्या वतीने भेट देण्यात आले.

खुर्चीसम्राट ग्रुपच्या सदस्यांच्या प्रयात्नातून प्रत्यक्षात आली. ग्रुपचे सदस्य दर्शन फुलपगार, अॅड. राजेंद्र कोल्हे, जुन्नर टाइम्सचे संपादक संदीप उतरडे, महेश शेळके, नाथ खैरे, आशिष वाजगे आदी सर्व ग्रुप सदस्यांच्या सहकार्याने मेडिकल क्षेत्रातील उत्साही कार्यकर्ते व ग्रुप सदस्य अशीष हांडे यांनी ” हाय ऑक्सीजन नोझल” मशीन एक लाख साहसष्ट हजार सहाशे साठ रुपये किंमतीचे आणले. ग्रुप सदस्य अॅड. राजेन्द्र खैरे, नाथ खैरे,अशीषभाऊ हांडे यांच्या हस्ते आणि डॉ. अभिजीत काळे, डॉ.ऋषिकेश रासने यांच्या उपस्थितीत “नारायणगांव ग्रामीण रुग्णालय येथील कोविड सेंटरला प्रदान करण्यात आले. या वेळी आशिभाऊ हांडे यांनी या बाबत डॉस्टरांना माहिती दिली. त्यातील बारकावे समजून सांगितले. या वेळी, वैद्यकीय कर्मचारी कमलाकर मेमाने, करवन्दे, पारधी, त्याचप्रमाणे अँबुलन्स चालक संजय भोर, अनिकेत नेवकर, गोट्या जाधव आणि श्री माने उपस्थित होते.

सध्या या कोविड सेंटर मध्ये चोवीस रुग्ण दाखल असून,गंभीर रुग्णांसाठी येथे पंचवीस बेड ची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. येथे फक्त गंभीर रुग्ण दाखल केले जात असून सौम्य रुग्ण व लक्षणं विरहित रुग्णांना लेण्याद्री किंवा ओझर येथे दाखल केले जात आहे. नारायणगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये रूग्णांसाठी चांगली व्यवस्था असून डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी रुग्णांची आस्थेने बोलून काळजी घेतात.

येथे डॉ. मिलिंद घोरपडे, डॉं.अभिजीत काळे, डॉ.ऋषिकेश रासने हे कार्यरत आहेत.

येथील ग्रामीण रुग्णालयातील “कोविड सेंटर मधील माहिती अॅड. राजेंद्र कोल्हे यांनी दिली. व ग्रामीण रूग्णालयाच्या चांगल्या कार्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *