आळे ग्रामपंचायत करणार कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती,नवीन कचरा प्रकल्प कार्यान्वित…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.16/8/2021

आळे ग्रामपंचायत करणार कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती,नवीन कचरा प्रकल्प कार्यान्वित

बातमी:-रामदास सांगळे,विभागीय संपादक,जुन्नर

आळे:- आळे (ता.जुन्नर) गावचा पथदर्शी कचरा प्रकल्प १५ ऑगस्ट पासून कार्यान्वित करण्यात आला.मागील काही दिवसांपूर्वी तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी प्रत्यक्ष पहाणी करून कामाचे कौतुक केले होते.गेले कित्येक दिवस या प्रकल्पावर काम सुरू होते, भौतिक सुविधा निर्माण केल्या नंतर कचऱ्यावर प्रक्रिया सुरू करण्याचे काम मार्गी लागले आहे, परंतू आता मोठी जबाबदारी आहे ती कचऱ्याचं विलगीकरण करून कचरा संकलन करणं, यासाठी कचरा गाडीतून कचरा गोळा करणारे सेवक व कचरा गाडीत टाकणारे ग्रामस्थ यांनी सजगपणे काम करणं महत्वाचं आहे.


गोळा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून शेंद्रिय खत निर्मिती करण्याचे काम सुरू झाले आहे. दररोजचा १ टन कचरा संकलित होत असून, अजून त्यात वाढ अपेक्षित आहे.

स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे,माजी पंचायत समिती सदस्य नेताजी डोके, माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली कुऱ्हाडे, विद्यमान पंचायत समिती सदस्य जिवन शिंदे, शाम माळी, आळे गावचे सरपंच प्रितम काळे, आळे डेअरीचे चेअरमन बापू गाढवे, ज्ञानेश्वर ग्रा.मंडळाचे उपाध्यक्ष उल्हास सहाणे, सर्व संचालक, ज्ञानराज पतसंस्थेचे चेअरमन दिलीपअप्पा वाव्हळ सर्व क्रियाशील ग्रा पं सदस्य, स्थानिक ग्रामस्थ, कचरा प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक व्यवस्थापकिय संचालक, सर्व ग्रा पं चे कर्मचारी, कचरा प्रकल्पात काम करणारे कर्मचारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *