स्वरूप अकॅडमी हडपसर यांच्यावतीने देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न…

ओझर प्रतिनिधी- मंगेश शेळके

दि.१६ ऑगस्ट २०२१ (ओझर):भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वरूपम अकॅडमी, काळे पडळ, हडपसर यांचे वतीने शंभूराजे अनाथालय, तुकाई दर्शन ,काळे पडळ,हडपसर येथे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला .
अॅकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर देशभक्तीपर गीते सादर केली.
अनाथाश्रमातील विद्यार्थी व वृद्ध यांच्या जीवनात आनंद देण्याचा प्रयत्न अकॅडमी च्या सर्व कलाकारांनी केला.
कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक मारुती आबा तुपे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कला परिवार हडपसर चे अनेक सदस्य उपस्थित होते .प्राध्यापक दिवटे सर यांच्या बासरी वादनाने सर्व अनाथ मुलांना मंत्र मुक्त करून सोडले. प्रमोद अय्या, नम्रता नाईक ,नंदू जगताप ,काजल माने यांनीसुद्धा सुरेल गीते गायली. याप्रसंगी कला परिवार हडपसर चे अध्यक्ष दिलीप मोरे यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास अनेक पालक उपस्थित होते .
तसेच निकिता जामदार ,
मानसी बनसोडे हे देखील उपस्थित होते.
सर्व उपस्थितांचा मंगेश ठुबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक काशिनाथ दिवटे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *