सिंबायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठ , किवळे , पुणे येथे राज्यपालांनी दिली भेट…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि १७ ऑगस्ट २०२१
सिंबायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठ , किवळे , पुणे हे महाराष्ट्रातील पहिले कौशल्य विद्यापीठ आहे . माननीय श्री भगतसिंह कोश्यारी , राज्यपाल , महाराष्ट्र राज्य यांनी मंगळवार १७ ऑगस्ट २०२१ रोजी या विद्यापीठास भेट दिली . या भेटी दरम्यान त्यांनी विद्यापीठाच्या आवारामधील व्यासायिक भागीदारांनी प्रस्थापित केलेल्या रिटेल , ब्युटी वेलनेस आणि अभियांत्रिकी विभागाचे शैक्षणिक कारखाने , कौशल्य प्रयोगशाळा यांची पाहणी केली , आणि या अभ्यासक्रमांच्या जागतिक पायाभूत सुविधा , कौशल्य घटक बघून ते प्रभावित झाले . डॉ एस बी मुजुमदार , कुलपती यांनी माननीय राज्यपालांचे स्वागत आणि सत्कार करून सिंबायोसिस ची यशोगाथा सांगितली . डॉ स्वाती मुजुमदार , प्र – कुलपती यांनी विद्यापीठाच्या दृष्टी , मिशन आणि अध्यापनशास्त्र यांचे सादरीकरण करताना कौशल्य शिक्षणाचे महत्व ही सांगितले . डॉ अश्विनी कुमार शर्मा , कुलगुरू यांनी विभागस्तरीय अभ्यासक्रमांची माहिती दिली . या विद्यापीठामध्ये ३००० पेक्षा जास्त विदयार्थी अभियांत्रिकी , व्यवस्थापन , डेटा सायन्स , स्थापत्य , ब्युटी वेलनेस या विभागस्तरीय अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत . वार्षिक इंटर्नशिप हा या अभ्यासक्रमाचे एक अविभाज्य घटक आहे .

माननीय राज्यपालांनी मजबूत व्यावसायिक हितसंबंध आणि दर वर्षी होणाऱ्या १०० % इंटर्नशिप आणि प्लेसमेंटच्या यशाबद्दल विद्यापीठाची प्रशंसा केली . कोविड १ ९ सारख्या जागतिक महामारीच्या आव्हानात्मक काळातही हे यश विद्यापीठाने राखले . माननीय राज्यपालांनी कुलपती डॉ एस बी मुजुमदार यांची दूरदृष्टी आणि डॉ स्वाती मुजुमदार यांनी महाराष्ट्रात प्रस्थापित केलेल्या अद्वितीय जागतिक दर्जाच्या कौशल्य विद्यापीठाचे कौतुक केले . या विद्यापीठातून बाहेर पडलेले विद्यार्थी त्यांच्या व्यवसायात पहिल्या दिवसापासून साधनसंपन्न होऊन त्यांच्या संघटनेसाठी , समाजासाठी आणि राष्ट्रासाठी सकारात्मक योगदान करतात . या विद्यापीठात स्व – व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ठ कौशल्य प्रशिक्षणाचे ही राज्यपालांनी पोठ भरून कौतुक केले . विद्यापीठाच्या कार्यक्रम संचालकांशी संवाद साधत , तिथल्या गुणवान आणि दीर्घ व्यावसायिक अनुभव असलेल्या अध्यापकांचेही राज्यपालांनी अभिनंदन केले .यावेळी
या वेळी ज्युनिअर काॅलजचे प्राचार्य भावना नरसिंग गोजु तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *