सर्प मैत्रीण नागेश्वरी केदारी यांनी पुन्हा पकडले विषारी नाग…पकडलेल्या नागांना पुन्हा सोडले निसर्गाच्या सानिध्यात…

नारायणगाव

कार्यकारी संपादक किरण वाजगे
जुन्नर,अकोला, संगमनेर तसेच उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बिनविषारी व विषारी साप पकडण्यात वाकबगार असलेली सर्प मैत्रीण नागेश्वरी केदारी यांनी नागपंचमीच्या दिवशी व पुन्हा आज नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी विषारी इंडियन कोब्रा जातीच्या नागाला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडले आहे.


नाग पंचमी च्या मुहूर्तावर मांजरवाडी येथील पिंटू गांडूळ व संतोष खंडागळे यांच्या घराजवळ तसेच आज
नारायणगाव येथील कोल्हेमळा शिवारात राहणाऱ्या छाया महाबरे यांच्या घराजवळ विषारी नाग असल्याचे समजल्यानंतर काहीवेळातच सर्प मैत्रिण नागेश्वरी केदारी यांनी घटनास्थळी जाऊन या विषारी नागांना शिताफीने पकडले व काही वेळातच निसर्गाच्या सान्निध्यात सोडले.


सर्प मैत्रिण नागेश्वरी केदारी यांनी आजपर्यंत सुमारे एक हजार पेक्षा जास्त वेगवेगळ्या जातीचे बिनविषारी तसेच विषारी साप पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडले आहेत. जुन्नर वनविभागाचे वनक्षेत्रपाल अजित शिंदे तसेच वनपाल एम.जे. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागेश्वरी केदारी यांनी अनेक सापांना जीवदान दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *