जय मल्हार सुपर किराणा मार्केट व्यवसायाचे उद्घाटन अतुलसिंह परदेशी यांच्या हस्ते संपन्न…

पवन गाडेकर
निवासी संपादक

जय मल्हार सुपर किराणा मार्केट (होलसेल) या व्यवसायाचे उद्घाटन प्रथम ग्राहक माझे जीवलग मित्र आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुलसिंह परदेशी यांच्या हस्ते संपन्न झाले…
    यावेळी प्रा.प्रा.निलेश चव्हाण  सिताराम दादा चव्हाण आपला आवाज न्यूज नेटवर्क चे निवासी संपादक पवन गाडेकर गणेश कासार व चव्हाण परिवार उपस्थित होता…
   कोरोना परिस्थितीचा विचार करता जय मल्हार सुपर किराणा मार्केट या व्यवसायाच्या उद्घाटनाचा खूप मोठा गाजावाजा न करता जाहीरात व इतर फ्लेक्स खर्च न करता जाहीरातीचा खर्च थेट ग्राहकाला डिस्काउंट मध्ये व्हावा अशा संकल्पनेतून आज 15 ऑगस्ट 2021 रोजी उद्घाटन समारंभ संपन्न झाला…या उद्घाटन समारंभा प्रसंगी प्रथम ग्राहक म्हणून माझे मित्र अतुलसिंह परदेशी यांनी खरेदी करत नारळ फोडून उद्घाटन केले तर माझे फोटो ग्राफर मित्र गणेश कासार यांनीही खरेदी करत उपस्थिती लावल्याने त्यांच्या हस्ते फित कट करून उद्घाटन संपन्न केले..

किराणा दुकान या व्यवसायाचा कोणताही अनुभव नसताना सर्व जीवन आवश्यक वस्तू जय मल्हार सुपर किराणा मार्केट मध्ये इतर दुकानाच्या तुलनेत स्वस्त असल्याने निश्चितच ग्राहकांना याचा फायदा होईल व उद्योजक निलेश चव्हाण यांच्या व्यवसायाला भरभराटी लाभेल अशा शुभेच्छा आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुलसिंह परदेशी यांनी यावेळी दिल्या….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *