वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी 
०६ जून २०२२

खामुंडी


खामुंडी (ता.जुन्नर ) हद्दीत उंब्रज चौकात वडाचे व पिंपळाच्या झाडांचे वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. ओतूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शना खाली वनपाल सुधाकर गिते आणि वनरक्षक अतुल वाघोले यांनी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाचे महत्व उपस्थितांना विशद केले तसेच काही दिवसात वरून राजाचे आगमन होणार आहे.

 

रोपन केलेली झाडे जोपासणे सहज सुलभ होणार आहे, नवीन बिया टाकणे व वृक्षारोपणाचा फायदा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मिळेल त्या योग्य जागेवर आपल्या घराचे अवतीभोवती वृक्षारोपण करणे क्रमप्राप्त असल्याचे तसेच या वृक्षारोपणाचा आदर्श सर्वानी घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. वनकर्मचारी किसन केदार, फुलचंद खंडागळे गंगाराम जाधव सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके, अनिल बोडके,चेअरमन नवनाथ शिंगोटे,हेमंत सोनवणे, राहुल लोहकरे, अवधूत रोकडे, दशरथ जगताप आदींनी वृक्षारोपनाकामी परिश्रम घेतले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *