व्हाँट्सअप ग्रुपचा अनोखा उपक्रम

व्हाँट्सअप ग्रुप वरील आवाहनातून व्हेंटिलेटरसाठी भरघोस मदत

नारायणगांव:- (किरण वाजगे,कार्यकारी संपादक)
संपूर्ण महाराष्ट्रा सह पुणे जिल्ह्यात तसेच जुन्नर तालुक्यात कोरोना संसर्गाने धुमाकुळ घातला आहे. शासन, प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींसह आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूने जुन्नर तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमाचे पत्रकार आणि सहकार्यांनी आपल्या खुर्ची सम्राट या व्हॉट्सॲप ग्रुप च्या माध्यमातून कोरोणाशी लढण्यासाठी व्हेंटिलेटर घेण्याचा संकल्प केला.

या अनुषंगाने खुर्चीसम्राट ग्रुपवर व्हेंटिलेटर घेण्यासाठी लोकवर्गणी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत अवघ्या दोन दिवसात सुमारे एक लाख ६५ हजार रुपये जमा झाले.

याबाबत अजूनही कोणाला मदत करण्याची इच्छा असेल तर दानशूर व्यक्तींनी गुगल पे क्रमांक ९७३०७५५४७५ यांचेशी संपर्क करून या अनोख्या उपक्रमाला मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे

कोरोना महामारी सुरू होऊन पाच महीने झाले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तालुक्यात लेण्याद्री आणि ओझर येथे कोविड सेंटर उभारले. या कोविड केंद्रात ऑक्सीजन ची व्यवस्था आहे मात्र व्हेंटिलेटरची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर शिवाय कोरोनाशी सामना करण्यात अपयश येत आहे. या अनुषंगाने खुर्ची सम्राट या व्हाँट्सअप ग्रुप च्या वतीने भावनिक आवाहन केले या नुसार भरीव अशी मदत गोळा होत आहे. अजूनही मदतीचा ओघ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *