शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पाच्या माहितीपटाचे सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे अनावरण

आपला आवाज न्यूज नेटवर्क
मुंबई प्रतिनीधी

१२ नोव्हेंबर २०२१ 

मुंबई


विघ्नहर मेडिकल फाउंडेशनच्या वतीने आयोजित शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पाच्या मिशन इम्पॉसिबल या माहितीपटाचे अनावरण राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आमदार अतुल बेनके विघ्नहर मेडिकल फाऊंडेशन व याप्रकल्पाचे प्रमुख डॉ.सदानंद राऊत यांच्या उपस्थितीत मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात करण्यात आले.

विघ्नहर मेडिकल फाऊंडेशनचे डाॅ.सदानंद राऊत यांचा उपक्रम

जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ याभागातील आदिवासी भाग तसेच देशातील इतरही दुर्गम तसेच ग्रामीण भागात सर्पदंश ही एक मोठी समस्या आहे. याबाबतच्या काही अंधश्रद्धा, गैरसमजुती दूर करण्यासाठी शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्प उपयुक्त ठरेल. सर्पदंशावरील लसी महाग आहेत. त्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची आवश्यकता आहे. आरोग्य विभागाने असे कार्यक्रम आयोजित करावेत, असे ना.वळसे पाटील साहेबांनी यावेळी सूचित केले.

शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पाच्या माहितीपटाचे सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे अनावरण

सर्पदंशाने होणारे मृत्यू कमी होण्यासाठी व सर्पदंशाबाबत जनजागृती करण्यासाठी शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पासारखे प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. यासंदर्भात डॉ.राऊत यांचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून सर्पदंश तज्ञ म्हणून ते जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात जाऊन काम करीत आहेत…


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *