महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख शाखा पुणे यांच्याकडून – आपत्तीग्रस्तांना ‘एक हात मदतीचा…

पुणे : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
    
   महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा , शाखा – पुणे यांच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्‍यात अतिवृष्टीने आपघातग्रस्त झालेल्या २५० कुटुंबीयांना  दि.१३ ऑगस्ट २०११ रोजी वस्तू रूपाने मदतीचे वाटप करण्यात आले.


        चिपळूण तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टीने व महापुराने आलेल्या आपत्तीने संकटात सापडलेल्या बांधवांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हातभार लावण्यासाठी पदवीधर शिक्षक संघटनेने शिक्षक बांधवांना केलेल्या आवाहनातून जमलेल्या निधीच्या माध्यमातून दैनंदिन वापराच्या आवश्यक टॉवेल, चादर, ब्लँकेट, साडी परकर, पँट शर्ट , सॅनिटरी नॅपकीन, लहान मुलांचे कपडे इ.  कपड्यांच्या  सुमारे २,४०,००० रुपये किमतीच्या २५० किटचे प्रत्यक्ष गावात जाऊन आपत्तीग्रस्तांना वाटप करण्यात आले. चिपळूण  तालुक्याचे तहसीलदार माननीय श्री.जयराज सूर्यवंशी  यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील कळकवणे दादर, नांदिवसे,  धनगरवाडी नांदिवसे , दादर , फणसवाडी (तिवरे), धनगरवाडी (तिवरे), कातकरवाडी (तिवरे), तिवरे गंगेचीवाडी , तिवरे इत्यादी गावात प्रत्यक्ष जाऊन मदत पोहोचवण्यात आली.


        दुर्गम आदिवासी भागात प्रत्यक्ष प्रवास करत असताना येऊन गेलेल्या भरंकर संकटाची तीव्रता जाणवत होती.  ठिकाणी ढासळलेल्या दरडी , यामुळे गाडलेले व वाहून गेलेले रस्ते, उध्वस्त झालेले पूल, पुराच्या पाण्याने व मातीच्या ढिगाऱ्याखाली उद्ध्वस्त झालेली घरे पाहून निसर्गाच्या भयंकर प्रकोपाची जाणीव वेळोवेळी होत होती. धोकादायक परिस्थितीतील कुटुंबांचे तात्पुरत्या निवाऱ्यात, सुरक्षितस्थळी स्थलांतर  करण्यात आले आहे . तेथील नागरिकांशी संवाद साधताना निसर्गाच्या भयंकर प्रकोपाची व उद्भवलेल्या असहाय प्रसंगाची माहिती समजत होती.  अशाही परिस्थितीत निसर्गाशी दोन हात करत लढणाऱ्या कोकणी माणसाचा दुर्दम्य आशावाद व त्यांच्यापर्यंत मदतीच्या रुपाने होणाऱ्या सहकार्य प्रति व्यक्त होणारा कृतज्ञतेचा भाव खूप काही सांगून जात होता.
       याप्रसंगी मंडल अधिकारी श्री. संदेश आयरे साहेब,  तसेच महसूल विभाग चिपळूण, ग्रामसेवक यांचे बहुमोल सहकार्य लाभल्यामुळे प्रत्यक्ष गरजूंपर्यत  मदत पोहोचवता आली. पदवीधर संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री शांताराम नेहेरे , केंद्रप्रमुख श्री. राजाराम बोंबले, खेड तालुका अध्यक्ष श्री. नारायण करपे,  पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी प्रतिनिधी लालासाहेब जगदाळे, राज्य प्रतिनिधी श्री.नामदेव गायकवाड, सदानंद माळशिरसकर, कार्यध्यक्ष तुषार वाटेकर, कोषाध्यक्ष खंडू काठे ,कल्याण पिंगळे, तानाजी खैरे,  अशोक सावंत, मारुती दिघे, दिलिप शिंदे ,  गणेश गोरे , सतीश भालचिम , विलास निसरड, सोमनाथ मुऱ्हे , संजय सुपे              इत्यादी कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन प्रत्यक्ष गरजूंपर्यंत साहित्य पोहोचविण्यात मोलाचा हातभार लावला. संघटनेच्यावतीने मदतीसाठी पुढे सरसावलेल्या सर्व शिक्षकांचे अभार मानले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *