मंचर शहरात उदया एकाच दिवशी १११ पथके प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करणार

मंचर शहरात उदया एकाच दिवशी १११ पथके प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करणार : तहसीलदार रमा जोशी यांची माहिती

प्रतिनिधी मोसीन काठेवाडी
मा. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे यांचे निर्देशानुसार मंचर शहरात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाधीत रूग्णांचा वाढता आलेख नियंत्रीत करणेसाठी तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तालुका आंबेगाव तर्फे मा. इंसिडेंट कंमाडर तथा उपविभागीय दंडाधिकारी उपविभाग मंचर यांचे मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक ९ रोजी एका दिवशी सर्वेक्षण मोहीम करणेत येणार आहे.

सदर दिवशी १११ पथके प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करणार आहेत. त्याचदिवशी संशयित रूग्णांची रॅपिड अँटिजेन्ट टेस्ट एकूण ६ सेंटर ठिकाणी होणार आहे.

याकामी ११ पर्यवेक्षक,६ अँटिजेन्ट स्वॅब्स कलेक्शन सेंटर , ६ टेस्टींग टिम, ३० टेस्टींग स्टाफ, १२पोलिस कर्मचारी वर्ग, ३ अॅब्युलंन्स,अतिरिक्त २० कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे .

यासाठी २५ स्वयंसेवक यांची मदत घेतली जाणार आहे. तसेच खाजगी लॅब्स यांचे सहकार्य मिळणार आहे.

सबब मंचर शहरातील सर्व नागरिकांनी यावेळी पथकाला खरी माहिती द्यावी तसेच १००% व्यक्तींनी घरी थांबावे.

सर्वेक्षण पथकाचे सूचनेवरुन तात्काळ सांगितलेल्या स्वॅब्स कलेक्शनस् आणि टेस्टींग सेंटर या ठिकाणी टेस्टिंग करून घ्यावे. पुढील अहवाल प्राप्त होताच सूचनेनुसार सी.सी.सी / डी.सी.एच सी मध्ये दाखल करण्यात येईल. याकामी सदर सर्वेक्षण मोहीमेस सर्व मंचर नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आंबेगाव तालुक्याचे तहसील दार रमा जोशी यांच्याकडुन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *