महानगरपालिकेचे २५ कर्मचारी झाले सेवानिवृत्त…

रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी – दि. ३० जुलै २०२१
सेवानिवृत्त कर्मचा-यांनी सेवानिवृत्तीनंतर आपल्या अनमोल आरोग्यास प्राधान्य देऊन जीवन व्यतीत करावे असे मत नगरसदस्य तसेच माजी प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे यांनी व्यक्त केले.

माहे जुलै २०२१ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या २४ आणि स्वेच्छा सेवानिवृत्त होणा-या १ कर्मचारी यांचा सत्कार नगरसदस्य अंबरनाथ कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे अविनाश ढमाले, सुप्रिया सुरगुडे, गोरख भालेकर आणि मिलींद काटे आदी उपस्थित होते.

नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-यांमध्ये मुख्याध्यापिका शारदा देसाई, सुनंदा खेडकर, कार्यालयीन अधिक्षक राजन हाटकर, मनोज भुतकर, लघुलेखक सिद्राम कांबळे, सिस्टर इनचार्ज सरोजिनी भिंगारदिवे, ललिता जाधव, मुख्य लिपिक प्रेमनाथ कांबळे, महेश जोशी, सहाय्यक शिक्षक शांताराम जाधव, केमिस्ट मंजुषा गांधी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक प्रविण कांबळे, रमेश कुडवे, दूरध्वनी चालक चंद्रकात गजमल, प्रमुख अग्निशमन विमोचक (लिडींग फायरमन) मोहन चव्हाण, शांताराम काटे, अग्निशमन विमोचक (फायरमन) भरत फाळके, प्रयोगशाळा सहाय्यक सुनिल सायकर, मुकादम दगडू लांडगे, गाळणी निरिक्षक सुनिल बोरकर, मजूर दिपक परदेशी, राजू गायकवाड, सफाई कामगार जयश्री अवचरे, सफाई सेवक मायाबाई भुंबक यांचा समावेश आहे. तर स्वेच्छा सेवानिवृत्ती घेणा-या कर्मचा-यांमध्ये कंपोस्ट कुली पांडुरंग हिले यांचा समावेश आहे.

महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी देखील सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांना शुभेच्छा दिल्या आणि महानगरपालिकेत सातत्य, सचोटी आणि प्रामाणिकपणे केलेल्या त्यांच्या प्रदीर्घ सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *