अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश अंतर्गत ,नवी मुंबई जिल्हा व राहता तालुका आयोजित प्रथम ऑनलाईन श्रावणोत्सव काव्यसंमेलन २०२१

ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके

दि.३० ऑगस्ट २०२१ (ओझर) : श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.
या वर्णनाप्रमाणे श्रावण हा कुंद पावसाचा, सणांची नांदी आणणारा व मन प्रफुल्लित करणारा असा हा महिना, अशाच प्रफुल्लित मनाने आम्ही दि. २९ ऑगस्ट २०२१ रोजी गुगल मीट तसेंच फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपात संध्याकाळी ४ वाजेपासून ते ७ वाजेपर्यंत हे काव्यसंमेलन संपन्न झाले.सदर संमेलनाला आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते माननीय माजी पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे माजी उत्पादन शुल्क मंत्री सन्मा. श्री. गणेशजी नाईक साहेब हे उद्घाटक म्हणून लाभले. अभामसापचे अध्यक्ष श्री. शरदजी गोरे सर प्रमुख अतिथी म्हणून संमेलनाला उपस्थित होते व मुंबई प्रदेशाध्यक्षा हिरकणी राजश्रीताई बोहरा यांनी संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले. सौ जान्हवी रणजीत कुंभारकर, नवी मुंबई जिल्हाध्यक्षा या कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्षा होत्या. सदर संमेलनाचे सूत्रसंचालन आमचे अ भा म सा परिषदेचे सन्मा. पदाधिकारी शबानाताई मुल्ला- नवी मुंबई उपाध्यक्षा, सुलभाताई भोसले – राहता तालुका अध्यक्षा व उषाताई राऊत – सरचिटणीस नवी मुंबई यांनी खूप सुंदर रित्या केले. श्री. भारत घेरे सर – नवी मुंबई कार्याध्यक्ष यांनी सर्वांचे आभार मानले. काव्य संमेलनासाठीचे सुंदर बॅनरचे ग्राफिक्स श्री. विठ्ठल घाडी सरांनी खूप सुंदर रित्या बनवले.
श्रावणातील निसर्ग सौंदर्य, विविध पारंपारिक सणांची रेलचेल, शेतकऱ्याची लगबग, माहेरवाशिणीची आतुरता, तरुणांच्या मनातील बहरणारी प्रीत अशा विविध विषयांना फुलवणाऱ्या बहारदार कविता या संमेलनात सादर करण्यात आल्या.
नाईक साहेबांनी आपल्या भाषणात साहित्याला सन्मानित करणारे आणि साहित्याचा गोडवा निर्माण करण्याचे काम तुम्ही आपल्या संमेलनातून करत आहात असे साहेबांनी आपल्या भाषणातून सांगितले. कोरोना काळात कटुता निर्माण झालेल्या वातावरणात गोडवा निर्माण करण्याचे काम या श्रावणाचे औचित्य साधून साहित्य संमेलनातून आपण करत आहात असे सांगितले.
संस्थेचे संस्थापक श्री. शरदजी गोरे सरांनी नवी मुंबई बद्दल प्रेम व्यक्त करताना कोरोना काळात दुःखाच्या गर्देत लोटलेल्या लोकांना आनंदाचा गारवा देण्याचे काम व सुखाचे क्षण वेचण्याचा आनंद आपण या संमेलनातून देत आहात त्याबद्दल मला तुमचा अभिमान आहे असे शब्द उच्चारले.
राजश्रीताईनी संमेलनाला शुभेच्छा देताना या श्रावणोत्सव काव्य संमेलनाची संकल्पना जान्हवी ताई यांची आहे व त्यांच्या संपूर्ण टीमने खूप सुंदर रित्या कार्यक्रम साकारला याबद्दल पोटभरून सर्वांचे गोड कौतुक केले तसेच सर्वात सुंदर संकल्पना म्हणजे हिरव्या रंगाचा वेश परिधान करण्याची व त्यानिमित्ताने हिरव्या रंगाच्या विविध छटा या कार्यक्रमाच्या रूपाने पाहायला मिळाल्या त्याबद्दल ही सर्वांचे त्यांनी गोड कौतुक केले. व पुढील वर्षी बाह्य परिस्थिती आटोक्यात आल्यावर हेच संमेलन प्रत्यक्ष मोठ्या स्वरूपात आयोजित करू असे आश्वासन देखील दिले.
काव्य संमेलनाला भारतभरातून तसेच भारताबाहेरुन ही खूप सुंदर प्रतिसाद मिळाला. परिषदेतील अनेक मान्यवर पदाधिकारी या संमेलनास आवर्जून उपस्थित होते. त्याच बरोबर एकुण ४० निमंत्रित सारस्वतांनी श्रावणोत्सव काव्य संमेलनामध्ये उस्फुर्त सहभाग घेउन श्रावणावर आधारित आपल्या सुंदर रचना सादर करून सर्वांना मंत्र मुग्ध केले.
ऑनलाइन श्रावणोत्सव काव्यसंमेलनासाठी पुढील कवींनी सहभाग नोंदवला. श्री. मयूर पालकर, श्रीम.डॉ श्यामल अग्रवाल, श्रीम. वनिता पाटील, श्रीम.नंदा कोकाटे, श्रीम.सायली पाटील, श्रीम.अपर्णा कुलकर्णी, श्रीम. हेमलता विसपुते, श्रीम.ज्योती देशपांडे, श्रीम. रझिया जमादार, श्रीम.राजश्री भावार्थी, श्रीम.कांचन नेवे, श्रीम.स्वाती दोंदे, श्रीम.भावना गांधिले, श्रीम. नीला सोनवणे, श्रीम.रीना मनोज दुधे, श्रीम.शोभा प्रवीण गायकवाड, श्रीम.नीना देसाई, श्रीम.रेखा गंगाखेडकर, श्रीम.स्मिता भिमनवार, श्रीम.देवयानी म्हंकाळे, श्रीम.सुरेखा कुलकर्णी, श्री. यश घोडे फोफसंडीकर, श्रीम.मंगला ढगे, श्रीम. रेवती बाविस्कर, श्रीम.विजया चिंचोळी, श्रीम.पुष्पावती मेतकर, श्रीम.स्मिता पेशवे, श्रीम. अनुराधा उपासे, श्रीम. तेजश्री कुलकर्णी, श्रीम.वृंन्दा खराटे, श्रीम.सुरेखा मैड, श्रीम. हर्षा पाटील, श्रीम.वर्षा फटकाळे, श्रीम.अलका पितृभक्त, श्रीम.माधुरी देवरे, श्रीम.आशा बर्वे, श्रीम.वैशाली टीचुकले, श्रीम.सुनिता कुलकर्णी, श्रीम. सुषमा भोसले, श्री.मुकुंद देवरे.
नवी मुंबई कार्यकारणी व राहता तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने खऱ्या अर्थाने हे काव्य संमेलन बहरले, खूप खूप सुंदर रित्या संपन्न झाले त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे व सर्व सारस्वतांचे हार्दिक हार्दिक आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *