विजयी मिरवणुक,रॅली काढल्यास फटाके वाजवल्यास,गुलाल उधळल्यास होणार कारवाई:- पोलीस निरीक्षक मधुकर पवार

बेल्हे दि.१७ (विभागीय संपादक रामदास सांगळे):-

आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असुन सोमवार (दि.१८) रोजी निकाल असुन या दिवशी विजयी मिरवणुका काढण्यास बंदी आहे अशी माहिती आळेफाटा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी दिली
आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील आळे,राजुरी, संतवाडी,कोळवाडी, उंचखडक, नळावणे,बोरी बुद्रुक,साळवाडी या गावांमधील ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असुन सोमवारी या निवडणुकांचे निकाल असुन या दिवशी कोणतेही गैरप्रकार घडू नये यासाठी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार उमेदवार,कार्यकर्ते व ग्रामस्थांना सुचित करण्यात येते की, आपण विजयी मिरवणुक काढु नये ,रॅली काढु नये,फटाके वाजु नये,गुलाल उधळू नये व विना परवानगीशिवाय फ्लेक्स लावू नये तसेच दि.१८ रोजी रात्री १० वाजल्यापासून दि.१९ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व हाँटेल,ढाबे,खानावळी,चायनीज,पान टपरी बंद राहणार असुन सदर आदेशाची अंमलबजावणी कडक केली जाणार आहे आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहीती पवार यांनी दिली.