प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत मातंग समाजाचे आदर्श लोकनेते नामदेवराव कांबळे यांना अखेर चा निरोप…

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
शिरूर(पुणे) : दि. 30/07/2021.

मातंग समाजाचे आदर्श नेते आदरणीय स्व. नामदेवराव कांबळे साहेब अमर रहे! नामदेवराव साहेब पुन्हा या ! अशा घोषणेत मातंग समाजाचा आधारस्तंभ असलेले महाराष्ट्रातील एक नावाजलेले मातंग समाजाचे नेते, व आदीलाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन, स्व. नामदेवराव कांबळे यांना हजारो दुःखितांच्या जनसमुदायाच्या उपस्थितित अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांना त्यांचे पुत्र यांनी मुखाग्नी दिली. याप्रसंगी एम. आर. पी. एस. चे नेते, आदरणीय मंदाकृष्णा मादीगा, तेलंगणा राज्यातील मंत्री जोगु रामन्ना, के. मूर्ती, आनंद भालेराव, धनाजी बसवंते, के. नरेश, खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष, नगरसेवक, यासह अन्य टी. आर. एस. चे नेते आदी मान्यवरांसह, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व. नामदेवराव कंबळे हे, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे असोसिएशन चे अध्यक्ष व आदिलाबाद मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन, तसेच मातंग समाजाचे एक आदर्श व मोठे नेते होते. त्यांचे दि. 28 जुलै 2021 रोजी हैदराबाद येथे हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले.


गुंजाळा मंडळ, नारनुर, जि. आदीलाबाद येथील नामदेवराव कांबळे हे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे लोकप्रिय नेते होते. उभ्या आयुष्यात त्यांनी निःस्वार्थ भावनेने जनतेची आणि समाजाची सेवा केली. अचानक जाण्याने मातंग समाजाची फार मोठी हानी झाली असून, मातंग समाजातून एक मौल्यवान हिरा गमावल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून येत आहे.
तेलंगणा राज्यात विदर्भ व मराठवाडा राज्यातील मातंग समाजाचे ते आधारवड होते. त्यांच्या जाण्याने मातंग समाजात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नामदेव कांबळे यांनी तेलंगाणा, विदर्भ व मराठवाडा राज्यातील मातंग समाजासाठी मोलाचे कार्य केले आहे. अण्णाभाऊ साठे जयंती, पुण्यतिथी, लहुजी वस्ताद साळवे जयंती, पुण्यतिथी, तसेच सर्वच क्षेत्रातील महामानवांच्या जयंत्या साजऱ्या करून, बहुजन समाजात त्यांनी आधुनिक व सामाजिक विचारांचे बीज पेरले होते.

त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना सर्वच पक्षाचे नेतेमंडळी मानत होते. त्यांनी बहुजन समाजातील अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. अनेक कौटूंबिक कलह व वादविवाद त्यांनी बैठका घेऊन निकाली काढल्याने अनेकांचे संसार नव्याने सुरू झालेत. अगदी हलाखीच्या परिस्थितीतुन आपल्या संसाराचा गाडा हाकत, समाजात चांगले नाव कमावत ते समाजासाठी अखेरपर्यंत झिजले.
त्यांच्या अचानक जाण्याने मातंग समाजावर, कुटूंबियावर तसेच इतर बहुजन समाजावर दुःखाची कुऱ्हाड कोसळली असून ती पोकळी न भरून निघणारे असे मातंग समाजाचे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना ईश्वर या बहु दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच आपला आवाज न्यूज नेटवर्क व केबल टी व्ही चॅनेलच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना.
नामदेव कांबळे यांच्या अंत्यविधीसाठी, गुंजाळा येथे महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाड्यासह आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यातून, मातंग समाजातील नेते, इतर समाजातील नेते, पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *