तासगाव तालुक्‍यात कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू-तर 112 कोरोना बाधित…

राजू थोरात तासगाव सांगली प्रतिनिधी

तासगाव तालुक्‍यात काल एकांच दिवशी सात जणांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली होती तर आज दोघांचा मृत्यु झाला आहे; त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे–
तासगाव तालुक्यातील 36 गावातून 112 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.. आज 147 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश कांबळे यांनी दिली आहे.. पुढे आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश कांबळे यांनी माहिती दिली की आळते 3बोरगाव14 खुजगाव3 नागाव नि 1तासगाव13 वडगाव8 आरवडे9 वाघापूर6 बलगवडे1 बस्तवडे 2चिखलगोठण1 चिंचणी 5ढवळी5 धोंडेवाडी1 डोंगरसोनी1 गौरगाव 1 हातनोली3 हातनुर 1जुळेवाडी1 कवठेएकद1कुमठे2 लिंब 2 मनेराजुरी2 मतकुणकी1 मोराळे2 नागाव क 1 नागेवाडी1 पानमळेवाडी1 राजापूर2 सावळज6 सावर्डे 2सिद्धेवाडी2 वासुंबे 1वायफळे1 येळावी3 योगेवाडी 5 अशा 36 गावातून 112 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.”
तर डिस्चार्ज 147 रूग्णांना दिला आहे. तर आज मृत्यू दोघांचा झाला आहे-आज आखेर 13970 कोरोना बाधित रुग्ण संख्या झाली आहे..
आज अखेर डिस्चार्ज रुग्णसंख्या 13663 झालेली आहे।
होम आयसोलेशन मध्ये 742 रुग्ण उपचार घेत आहेत..
आज आखेर 414 रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला आहे.
अंटीजेनटेस्ट 1045नागरिकांची घेतलेली आहे.. तासगांव तालुक्यात 4 दिवसात कोरोना मुळे मृत्यू होत असल्याने नागरिकांमधून घबराटीचे वातावरण पसरलेले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *