बंद टोल नाक्यावर चक्क गावठी कट्टयांची विक्री – LCB ला खबर मिळताच, सापळा रचत गुन्हेगारांना केले जेरबंद…

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
नगर : दि. 03/07/2021.

अहमदनगर जिल्ह्यातील नगर – जामखेड रोडवरील, बंद असलेल्या टाकळी काझी येथील टोलनाक्यावर, चक्क गावठी पिस्तूल विक्रीचा धंदा चालत होता. ग्राहकांना येथे येण्यास सांगून, तेथेच सौदा करून हत्याराची विक्रीही केली जात होती. गुप्त बातमीदाराच्या मार्फत, अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना याची माहिती मिळाली होती.
त्यामुळे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, विभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, LCB प्रमुख अनिल कटके यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्यावर ही कामगिरी सोपविली होती. त्यांनी लागलीच खबर मिळालेल्या ठिकाणावर छापा टाकून, दोघा जणांना मुद्देमालासह अटक केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, नगर – जामखेड रोडवरील टाकळी काझी शिवारातील टोल नाक्याजवळ, दोन तरुण गावठी कट्टयाची विक्री करण्यासाठी थांबले असल्याची माहिती, अहमदनगर चे LCB प्रमुख अनिल कटके यांना गुप्त बतमीदारामार्फत मिळालेली होती. कटके यांनी माहितीची खातरजमा करून, तातडीने सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या नेतृत्वाखालील एक पथक, साध्या वेशात आणि खाजगी वाहनातून रवाना केले.

Advertise

या पथकात API सोमनाथ दिवटे, PSI गणेश इंगळे, ASI नानेकर, हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, पोना शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, पोकॉ राहुल सोळुंके यांचा सहभाग होता.

     टोलनाक्याच्या बाजूलाच बंद असलेल्या एका इमारतीच्या पाठीमागे, दोघे जण संशयास्पदरित्या थांबल्याचे पोलिसांना आढळून आले. ते दोघे संशयित, टेहळणी करीत असल्याचेही पोलिसांच्या लक्षात आले. परंतु खाजगी वेशातील पोलिसांना पाहून ते विचलित झाले व पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, तोपर्यंत पोलिसांनी आधीच सावधानतेने घातलेल्या घेरावात, ते अलगद अडकले. 

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी –
1) संदीप पोपट गायकवाड (वय ४० वर्षे, रा. जांबुत, ता. शिरुर, जि. पुणे) 2) भारत भगवान हतागळे (वय २५ रा. गोविंदवाडी, तलवाडा, ता. गेवराई, जि. बीड)
अशी त्यांची नावे असल्याचे सांगितले.

  पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे दोन गावठी बनावटीचे कट्टे, दोन जिवंत काडतूसे व दोन मोबाईल असा सुमारे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला असून दोघाही आरोपींना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *