अक्षता कान्हूरकर राजगुरुनगर प्रतिनिधी
राजगुरूनगर- दि १३ जून २०२१
खेड तालुक्यातील वाडा या गावातील कुणाल पावडे २२ वर्षाच्या युवकास काही दिवसांपुर्वी कावीळीची बाधा झाली होती. आजार वाढत गेला आणि यकृत प्रत्यारोपन हे ऑपरेशन कुणालचे करण्याचे ठरले.
त्यासाठी कुणालच्या बहीणीने यकृतदान देण्याचे ठरवले त्यानुसार रुबी हॉल येथे यकृत प्रत्यारोपन हे ऑपरेशन झाले. ऑपरेशन झाल्यावर सहा दिवसांतच कुणालची प्रकृती चिंताजनक होत गेली आणि त्याची गुरुवार दिनांक १० जुन २०२१ रोजी रात्री ९ वाजता प्राणज्योत मावळली.
कुणालची घरची आर्थिक परीस्थीती ही अतिशय नाजुक आहे कुणाल हा सर्व मित्रपरिवारात लाडका होता. तो होमगार्डमधे कार्यरत होता. यकृत प्रत्यारोपनचा ३० लाखापर्यंतचा फार मोठा
खर्च त्याच्या घरच्यांना पेलावनारा अजिबात नव्हता. कुणालच्या मित्र परिवाराने हा खर्च करण्यासाठी समाजातुन आर्थिक मदत गोळा करायला सुरुवात केली. रुबी हॉलने १० लाख रु ऑपरेशनचे होतील आणि २ लाख मेडीसिनचे होतील असे एकुन १२ लाख रुपये भरा म्हणुन सांगितले बाकीची सर्व रक्कम NGO संस्थाकडुन आम्ही घेऊ असे सांगितले. त्यानुसार पावडे कुटुंबाने सदर रक्कम १२ लाख रुपये रुबी हॉलमधे भरली.
कुणालचे दु:खद निधन झाल्यावर झाल्यावर रुबी हॉलने सांगितले की १२ लाख रु हा खर्च फक्त ऑपरेशनचा आहे. तुमचा पेशंट ॲडमीट झाल्यापासुन ऑपरेशन सोडुन बाकीचा सर्व खर्च ४ लाख रुपये झाला आहे. ही सर्व रक्कम भरेपर्यत कुणालचा मृतदेह ताब्यात देनार नाही म्हणुन त्यांनी पावडे कुटुंबाच्या ताब्यात कुणालचा मृतदेह
न देता १८ तास ताटकळत ठेवला.
पावडे कुटुंबातील सदस्यांनी दिवसभर अनेक प्रयत्न केले. समाजातुन तालुक्याच्या प्रतिनिधीपांसुन ते विविध पक्षाचे अनेक मित्र मंडळीनी कुणालचा मृतदेह ताब्यात मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु रुबी हॉलने उर्वरीत बिलाची रक्कम भरल्याशिवाय मृतदेह देणार नाही ही कठोर भुमीका कायम ठेवली. राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार मा.अजितदादा पवार साहेब पुण्यामधे आलेले आहेत असे समजल्यावर पावडे कुटुंबाने ही व्यथा सायंकाळी शुक्रवारी ५:०० वाजताच्या दरम्यान अजितदादांच्या समोर मांडली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अजितदादांनी रुबी हॉलमधे एक फोन केल्यावर लगेचच कुणालचा मृतदेह पावडे कुटुंबाच्या ताब्यात देतो असे सांगितले. त्यानुसार सायंकाळी ६ वाजता कुणालचा मृतदेह पावडे कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. मृत्युशी झुंज देत असताना कुणालच्या मृत्युनंतरही अंत्यविधी होईपर्यंत पावडे कुटुंबाला संघर्ष करावा लागला ..
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या या कार्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आभार मानले.