सांगली जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर सुविधा द्या ;भाजपाची जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी..

प्रतिनिधी राजू थोरात,तासगाव, सांगली

सांगली जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरती वाहनधारकांना मोफत हवा,पिण्याचे पाणी व स्वछता ग्रुह आदी सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध नाहीत.तरी या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे वतीने आ.सुरेशभाऊ खाडे यांचे उपस्थितीत जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी भाजप सरचिटणीस रवींद्र साळुंखे, मोहन व्हनखडे,प्रदेश सचिव किसान मोर्चा रोहित चिवटे,ओंकार शुक्ल,मा.तासगाव अध्यक्ष महेश पाटील, प्रशांत कुलकर्णी,मनोज पाटील आदी उपस्थित होते.

पुढे निवेदनात म्हटले आहे की,कोरोना संकटामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. इंधन भरण्यासाठी पंपावरती गेल्यास तिथे हवा,पिण्याचे पाणी व स्वछता ग्रुह आदी सुविधा मिळत नाहीत.स्वच्छता ग्रुह अस्वच्छ, नादुरुस्त व गैरसोईचे आहेत.काही ठिकाणी कुलूप लावलेली आहेत. महिला वाहनधारकांची कुचंबणा होत आहे.हवेचे मशीन अनेक ठिकाणी बंद अवस्थेत आहेत.तरी या मागण्यांची दखल घेऊन तातडीने सुविधा पुर्ववत ह्वावी.जनतेची सोय करावी.

Advertise

दरम्यान, मा.जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बर्वे व आ.सुरेश भाऊ खाडे यांच्या बैठकीत पेट्रोल पंपाच्या सुविधा विषयी चर्चा झाली.आठ दिवसांत सोई सुविधा देणेचे पंप डिलर प्रतिनिधी यांना निर्देश देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.