मंचर | स्वर्गीय गणपत बाणखेले यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन..

स्वर्गीय गणपत बाणखेले यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन

किरण वाजगे यांचे ४७ व्या वेळी रक्तदान

मंचर
भीमाशंकर जनसेवा संघ, डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर तसेच कैलासवासी गणपत बाणखेले समाज विकास प्रतिष्ठानच्या वतीने स्वर्गीय गणपत बाणखेले यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिर व महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील गोकर्णेश्वर मंदिर ढोबीमळा येथे आयोजिन करण्यात आले होते.


या शिबिरात बालरोग, अस्थिरो, नेत्रचिकित्सा, स्त्रीरोग आदी सर्व रोगांवरील रुग्णांवर उपचार व तपासणी करण्यात आली. या वेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान केले
या प्रसंगी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख सुरेश भोर, भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम प्राचार्य नानासाहेब गायकवाड, प्राचार्य आवारी माजी पंचायत समिती व शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी राजाराम बाणखेले, बाळासाहेब बाणखेले, किरण वाजगे संजय बाणखेले, शरद फुलसुंदर, दिलिप मेंगडे, संदिप वायाळ, महेश वालझाडे, विकास फुलसुंदर, डॉ. गुजराती, डॉ. लोहकरे, अजित चासकर, नितीन भोर, रमेश भालेराव, तसेच स्वर्गीय गणपत बाणखेले मित्र परिवार उपस्थित होते.


या कार्यक्रमाप्रसंगी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हॉइस चेअरमन तथा पत्रकार किरण वाजगे यांचे ४७ व्या वेळी रक्तदान केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *