“अश्रू जाणणारी संस्कृती जगात श्रेष्ठ!” – प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१४ डिसेंबर २०२२

पिंपरी


“अश्रू जाणणारी संस्कृती जगात श्रेष्ठ असते; आणि सानेगुरुजी म्हणजे या संस्कृतीचे संचित होय!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मंगळवार, दिनांक १३ डिसेंबर २०२२ रोजी ऑटो क्लस्टर सभागृह, चिंचवड येथे व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि शब्दधन काव्यमंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्यामची आई कृतज्ञता सोहळ्यात प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ कवयित्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ती राधाबाई वाघमारे यांना (श्यामची आई) आणि त्यांचे सुपुत्र उद्योजक प्रवीण वाघमारे यांना (श्याम) पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. टाटा मोटर्समधील निवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर, महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) कार्यवाह उद्धव कानडे यांची प्रमुख अतिथी आणि नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांची स्वागताध्यक्ष म्हणून सोहळ्यात उपस्थिती होती.

अभियांत्रिकी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय संशोधक डॉ. भरत पाडेकर (सानेगुरुजी विचारसाधना), श्रीराम