शिवतेजनगरमध्ये झिमा,फुगडी, गाणी म्हणत महिलांनी केला नागपंचमी सण साजरा

संगीता तरडे
विभागीय संपादिका
०२ ऑगस्ट २०२२

पिंपरी


श्री स्वामी समर्थ महिला मंडळ व कै. सदाशिव बहिरवाडे प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवतेजनगर येथे नागपंचमी उत्सव मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. नाग प्रतिमेचे पूजन तसेच झोक्याचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांच्या हस्ते झाले. कविता खराडे, वर्षा जगताप, ज्योती जाधव, सारिका पवार, ज्योती गोफणे आदी महिला उपस्थित होत्या.

 

प्रतिष्ठानच्या वतीने 6 फूट उंचीची नागदेवताची प्रतिकृती तयार करण्यात आली. महिलासाठी उंच झोका देखील बांधण्यात आला होता. महिलांनी पारंपरिक खेळ, झिमा,फुगडी, फेर,नाच, गाणी म्हणत आणि सर्वांनी झोका खेळण्याचा आनंद घेत सण साजरा केला. पारंपरिक खेळाचा कार्यक्रम पुन्हा सायंकाळी 4 ते रात्री 7 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन अर्चना तोंदकर, श्रदा बहिरवाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अंजली देव, सारिका रिकामे, नीलिमा भंगाळे, प्रीती झोपे, क्षमा काळे, छाया सातपुते, मोहिनी शिराळकर आदींनी परिश्रम घेतले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *