पिंपरी चिंचवड शहरात कोविड १९ लसीचा तूटवडा-नगरसेवक राहुल कलाटे…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी – दि २६ एप्रिल २०२१
पिंपरी चिंचवड शहरात एकूण 100 पेक्षा जास्त लसीकरण केंद्रांमधून नागरिकांना लस देण्याचे काम सुरू आहे. त्यात पिंपरी-चिंचवड मनपाची लसकेंद्र ६० तर खाजगी ३० . लसीकरण केंद्रातून सुरू आहे. परंतु आज १९ केंद्र सुरू असून इतर लसीकरण केंद्र लसी अभावी बंद आहेत. याबाबत माहिती घेतल्यानंतर लसीची उपलब्धता नसल्याची माहिती मिळाली. केंद्र सरकारने 18 वर्षावरील नागरिकांना लस देण्याचे जाहीर केले आहे. तरी आयुक्त साहेब आपण एक तारखेपासून 18 वर्षावरील सर्वांना लगेच देणार आहोत असे असताना आज रोजी आपल्याकडे लसीचा साठा कमी आहे तर आपण पुढे नियोजन कसे करणार कारण महापौरांनी पुढील एक महिन्यात दहा लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे जाहीर केले आहे. वास्तविक केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा कमी असताना सत्ताधारी भाजप व महापौरांनी जाहीर केलेले उद्दिष्ट आपण कसे साध्य करणार असा सवाल राहुल कलाटे यांनी आयक्तांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तरी आज असणारी लसीकरण केंद्र दुपारी लसी अभावी बंद करावी लागतात किंवा मोठ्या प्रमाणात पूर्णपणे बंद ठेवावे लागतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तूर्तास कठोर निर्बंधाबरोबर लसीकरण करणे हा महत्त्वाचा पर्याय आहे. तरी सर्व लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होईल अशा प्रकारचे नियोजन करून लसीकरणाचा कृती आराखडा जाहीर करावा जेणेकरून नागरिकांमध्ये लसीकरण बरोबरच लसीकरण केंद्राची जनजागृती होईल .
असे निवेदन राहुल कलाटे यांनी पिंपरी चिंचवड चे आयुक्त राजेश पाटील यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *