पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने पिंपरी रोटरी क्लब च्या सहकार्याने ४५ वर्षावरील दिव्यांगांसाठी कोविड १९ लसीकरणासाचा आधार देणारी राज्यातील पहिली पालिका

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी,२७ एप्रिल-पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग कक्ष व रोटरी क्लब ॲाफ पिंपरी यांच्या सहकार्याने शहरातील ४५ वर्षावरील दिव्यांगांसाठी स्वतंत्र कोवीड १९ लसीकरण केंद्र रोटरी क्लब सभागृह संभाजीनगर चिंचवड येथे बुधवार दि २८ एप्रिल पासून सुरू करण्यात येणार असून शहरातील सर्व पात्र दिव्यांग व्यक्तींनी लाभ घ्यावा असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे,पक्षनेते नामदेव ढाके व आयुक्त राजेश पाटील यांनी केले.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कोवीड १९ लसीकरण केंद्र शहरात विविध ठिकाणी कार्यरत आहेत.दिव्यांग व्यक्तींसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून स्वतंत्रपणे लसीकरण केंद्र रोटरी क्लबच्या सहकार्याने सुरू करण्यात येत असून असा उपक्रम राबविणारी पिंपरी चिंचवड ही राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरात एकूण २१४५ दिव्यांग ४५ वर्षावरील असून ते लसीकरणासाठी पात्र आहेत.
नागरवस्ती विेभागाकडील दिव्यांग कक्ष विभागाचे उपायुक्त अजय चारठणकर व सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी रोटरी क्लब पिंपरी चे अध्यक्ष मेहूल परमार यांचे समवेत नियोजन केले आहे.
सर्व दिव्यांगांना लसीकरण केंद्रावर आणण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केली आहे.लसीकरण केंद्रावरआकुर्डी रूग्णालयाच्या प्रमुख डॅा सुनिता साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकिय पथक कार्यरत असणार आहे.
कोवीड लसीकरण हे सुरक्षित आहे.कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *