शिक्षण महर्षी स्व.तात्यासाहेब गुंजाळ संस्थापक जयहिंद ग्रुप यांचे दुखद निधन…

निधन वार्ता, 18/10/2020

नारायणगांव प्रतिनिधी

जुन्नर तालुक्याचे शिक्षण महर्षी तसेच सहकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व जनार्दन उर्फ तात्यासाहेब रखमाजी गुंजाळ यांचे आज 18 ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले…

गेली 19 दिवस तात्यासाहेब गुंजाळ यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते…

आज अखेर सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला…

जुन्नर तालुक्यातील कुरण येथील माळरानावर शिक्षणाची गंगा उभे करणारे तात्यासाहेब गुंजाळ यांनी जयहिंद इंस्टिट्यूट च्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवले…

तात्यासाहेब गुंजाळ यांच्या निधनामुळे जुन्नर तालुक्याची सामाजिक शैक्षणिक राजकीय अशी खूप मोठी हाणी झाली आहे…

जुन्नर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष दिपेशसिंह परदेशी तसेच
आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुलसिंह परदेशी या परदेशी बंन्धूच्या आयुष्यातील तात्यासाहेब गुंजाळ हे टर्निंग मॅन होते

तात्यासाहेब गुंजाळ यांना
आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवार
तसेच परदेशी परीवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
💐💐🙏🙏💐💐🙏🙏💐💐