गोरगरीब जनतेसाठी धावून आला नगरसेवक, जिजामाता रुग्णालयामध्ये अत्याधुनिक उपकरणांचा लोकार्पण सोहळा संपन्न…

संदीप वाघेरे यांचे दारुत्व स्वखर्चातून ५० फाऊलर बेड,४ व्हेन्टीलेटर,२ हायफ्लो नागरिकांसाठी अर्पण….

रोहित खर्गे
विभागीय संपादक

 पिंपरी – दि २६ एप्रिल २०२१
 पिंपरी येथील नवीन जिजामाता रुग्णालय येथे भाजपा नगरसेवक श्री संदीप वाघेरे यांच्या स्वखर्चातून देण्यात आलेल्या ५० फाऊलर बेड,४ व्हेंटिलेटर व २ हायफ्लो मशीन या उपकरणांचा लोकार्पण सोहळा मावळ मतदार संघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, नगरसेवक श्री संदीप वाघेरे, आयुक्त राजेशजी पाटील, माजी आमदार विलास लांडे, गौतम चाबुकस्वार, शिवसेना गटनेते राहुल कलाटे माजी नगरसेवक श्री नारायण बहिरवाडे पी.सी.एम.टी. चे माजी सभापती संतोष कुदळे, प्रभाग सदस्य कुणाल लांडगे यांच्या उपस्थितीत पार पडला.


          यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना वाघेरे म्हणाले की पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाव्हायरस ने थैमान घातले आहे शहरांमध्ये रुग्णांची संख्या कित्येक दिवस २००० ते २८०० एवढ्या प्रमाणावर आढळून येत आहे. त्यामुळे रुग्णांचे अतिशय हाल होत असून रुग्ण व नातेवाईक यांची ससेहोलपट होताना अतिशय दू:ख होत होते. यासाठी पालिका प्रशासन ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत आहे परंतु ही अभूतपूर्व परिस्थिती हाताळताना प्रशासकीय यंत्रणा अपुरी पडत असताना या यंत्रणेला छोटासा हातभार लावण्याचा मी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी स्वखर्चातून ५० फाऊलेर बेड ४ वेंटीलेटर व २ हायफ्लो मशीन ही अत्याधुनिक उपकरणे देऊन मी खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. एका जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर आग लागते त्यावेळी एक चिमणी आपल्या चोचीमध्ये पाणी घेऊन ती आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असते त्यावेळी इतर पक्षी म्हणाले की, तू कितीही प्रयत्न केले तरी आग मी जाणार नाही. तेव्हा चिमणी म्हणाली की कधी काळी या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणार्‍यामध्ये नाही तर विजवणार्‍यामध्ये लिहिले जाईल.सत्ता,पद, प्रतिष्ठा या पलीकडे जाऊन सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून मी हे काम करीत आहे.सत्ता आणि खुर्ची ही राबवायची असते उबवायची नसते.हे ब्रीद घेऊन मी आजपर्यंत समाजात काम करीत आहे. मी सदविवेक बुद्धीने मला जे शक्य होईल त्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे.ज्या समाजाने मला नेतृत्व करण्याची संधि दिली त्यांच्या ऋणातून थोड्याफार प्रमाणात उतराई होण्यासाठी मी हा प्रयत्न करीत आहे.  या वैद्यकीय उपकरणातून काही रुग्णांना तरी दिलासा मिळाला तरी माझे हे प्रयत्न सत्कारणी लागेल असे मी समजतो.
      यावेळी बोलताना आयुक्त राजेशजी पाटील म्हणाले की आजचा दिवस हा अत्यंत आनंदाचा आहे शहरांमधून वेगवेगळ्या निगेटिव बातम्या कानावर पडत असताना विद्यमान नगरसेवक संदीप वाघेरे यांनी हा एक वेगळा उपक्रम हाती घेत महापालिकेला मोठे सहकार्य केले आहे. त्यांनी स्वखर्चातून लोकार्पण केलेल्या अत्याधुनिक उपकरणांचा लाभ निश्चितच शहरातील नागरिकांना होणार आहे यात शंका नाही तसेच खासदार बारणे व माजी आमदार विलास लांडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत त्यांच्या या उपक्रमामुळे इतरही लोकप्रतिनिधी व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करीत असलेल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे शहरातील कोरोंना बाधित रुग्णांना या उपकरणांचा लाभ होणार आहे असे सांगत संपूर्ण शहरवासीयांच्या वतीने वाघेरे यांचे आभार मानले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कातळे यांनी केले व कार्यक्रमाचे आयोजन संदीप वाघेरे युवा मंचचे अध्यक्ष हरिष वाघेरे, राजेंद्र वाघेरे, अमित कुदळे, शुभम शिंदे,श्रीकांत वाघेरे,आकाश चव्हाण,विठ्ठल जाधव, रंजना जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *