रेमडेसिवीर इंजेक्शन तालुक्याला कमी पडून देऊ नका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची प्रशासनाकडे मागणी

अनेक रूग्ण व नातेवाईक रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या प्रतिक्षेत

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
जुन्नर तालुक्यातील कोरोनाविषाणू संसर्गामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना अत्यावश्यक असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन तात्काळ उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदार हनुमंत कोळेकर यांना आज करण्यात आली.
जुन्नर तालुक्यात कोरोना विषाणूचे दिवसेंदिवस रूग्ण वाढत आहेत. अनेक रूग्णांना डाॅक्टर रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्यासाठी सांगत आहेत. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार रेमडेसिवीर कोविड सेंटरला उपलब्ध होणार असल्याचे सांगितले परंतु आजही अनेक रूग्ण व नातेवाईक रेमडेसिवीरच्या प्रतिक्षेत आहेत.
प्रशासनाने सर्व कोविड सेंटर यांचे अपडेट घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवावेत तसेच कोविड सेंटरला प्रशासनाच्या वतीने ऑडिटर नेमावा ही प्रामुख्याने मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जुन्नर च्या तहसीलदारांकडे केली. तसेच काही डाॅक्टर रूग्णांकडून इतर चार्ज आकारत आहेत हे निदर्शनास आणून अशा गोष्टींना आळा बसवावा. याबाबत चर्चा करून अशा संबंधित डाॅक्टरांना समन्स बजावावेत ही मागणीही तहसिलदार यांचेकडे केली.
लोकप्रतिनिधी आज सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत त्याचप्रमाणे प्रशासनानेही प्रत्येक कोविड सेंटरचा आढावा घेऊन रुग्णांसाठी प्रयत्न केलेच पाहिजेत.
जुन्नर तालुक्यातील कोरोना रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची हेळसांड व्हायला नको यासाठी तहसीलदार यांच्याकडे रेमडेसिवीर साठी मागणी केली अशी माहिती युवक तालुकाध्यक्ष सुरजभाऊ वाजगे यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी चे तालुका प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे, युवक उपाध्यक्ष राहुल गावडे, नगरसेवक भाऊ कुंभार, खामगावचे उपसरपंच अजिंक्य घोलप, शैलेश तांबे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *