रिक्षाचालक फेरीवाले घरकामगार महिला यांची दखल घेतल्याबद्दल कष्टकरी जनतेच्या वतीने आभार : बाबा कांबळे…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी :- दि १६ एप्रिल २०२१
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने रिक्षाचालक ,टपरी पथारी हातगाडी धारक , धुणीभांडी काम करणाऱ्या घरकामगार महिलांसह कष्टकरी जनतेला प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे,

या निर्णयाचे कष्टकरी कामगार पंचायत आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी स्वागत केले असून श्रमिक कामगार कष्ट करणाऱ्या जनतेचा हा सन्मान असून गेल्या वीस वर्षांपासून या घटकांसाठी लढा देत आहे आज या घटकांची दखल घेतली याबद्दल समाधान वाटत असून कष्टकऱ्यांना रिक्षाचालकांना सन्मान मिळावा या आपल्या मागणीला यश येत आहे याबद्दल आनंद होत आहे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व पदाधिकारी अधिकारी आणि शहरातील आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आणि महेश दादा लांडगे यांचे कष्टकरी जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो असे मत या वेळी बाबा कांबळे यांनी व्यक्त केले आहे ,
,
कॉमेडी 19 धोरणामुळे सरकारने पंधरा दिवसाचा लोक डाऊन जाहीर केला असून संचारबंदी केली आहे यामुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब कष्टकऱ्यांची उपजीविका आणि त्यांचे व्यवसाय बंद आहेत यामुळे त्यांच्यावर उपासमार ची वेळ येऊ नये यामुळे शासनाने त्यांना मदत करावी अशा प्रकारची मागणी वेळोवेळी कष्टकरी कामगार पंचायत व महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केली होती ,

कोरोनामुळे व्यवसाय बंद असल्यामुळे रिक्षाचालक फेरीवाले धुणी-भांडी काम करणाऱ्या महिला बांधकाम मजूर, या घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे हातावर पोट असल्यामुळे व्यवसाय बंद तर मग जगायचे कसे हा मोठा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे, या घटकावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणूनच महाराष्ट्र सरकारच्या वतीने प्रत्येकी दीड हजार रुपये आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येकी तीन हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे,
या वेळी राज्य सरकारचे हि बाबा कांबळे यांनी आभार व्यक्त केले ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *