रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी- दि १६ एप्रिल २०२१
सध्या कोरोणाची दुसरी लाट प्रचंड वेगाने आली असून रोज दोन हजार च्या वर कोरोना रुग्ण आढळतात तर मृत्यूचा आकडा काल ६० पार केला. मृत्यूचे हे वाढते प्रमाण पाहता स्मशानभूमी मध्ये अंत्यविधी संस्कारासाठी मृत रुग्णास अंबुलन्स मध्ये तासनतास लाईन मध्ये थांबावे लागते.
त्या कारणाने अंबुलन्स ही अडकून पडत आहेत. त्यामुळे गरज असलेल्या रुग्णांना अंबुलन्स उपलब्ध होत नसल्याचे समोर आले. तसेच मृत वेक्तीच्या नातेवाईकांना तासनतास स्मशानभूमी मध्ये ताटकळत उभे राहावे लागते.
या साठी स्मशानभूमी बाहेर तात्पुरत्या स्वरूपाचे मर्च्युरी कक्ष बनवावे. तेथे मर्च्युरी कक्ष झाल्यास मृतदेह त्या मर्च्युरी कशात ठेवता येईल. त्यामुळे दुसऱ्या रुग्णांना अंबुलन्स ही लवकर उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे नागरिकांच्या अनेक अडचणी दूर होण्यास मदत होईल.
तरी लवकरात लवकर मर्च्युरी कक्ष बनवण्यात यावे असे निवेदन आयुक्त राजेश पाटील यांना दिले.