शिरूर ,प्रतिनिधी
विभागीय संपादक रवींद्र खुडे
सरकारी यंत्रना व पोलिस यंत्रनेचा खंडनीसाठी गैरवापर करणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख, यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा. तसेच राजीनामा घेतल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेने त्यांची चौकशी करावी. महाराष्ट्राला विकण्यासाठी निघालेल्या निष्क्रिय आघाडीने, आतापर्यंत वाझेच्या माध्यमातून हप्ते पोहोचत होते तोपर्यंत सगळी मंडळी चिडीचूप होती. वाझेला अटक झाली आणि त्यांचे दुसरे कारनामे आणि कांडसुद्धा बाहेर पडले. जर अनिल देशमुख यांनी राजिनामा लवकर दिला नाही तर भाजपा च्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल. असा सज्जड इशारा शिरूर शहर भाजपने दिलाआंदोलनात कार्याध्यक्ष मितेश गादिया, संघटन सरचिटणीस नवनाथ जाधव, सरचिटणीस विजय नर्के, तालुका संपर्क प्रमुख बाबुराव पाचंगे, रिक्षा संघटणेचे अध्यक्ष अनिल बांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष निलेश नवले, युवामोर्चा अध्यक्ष उमेश शेळके, माजी अध्यक्ष केशव लोखंडे, युवामोर्चा सरचिटणीस ओंकार ससाणे, महिला अध्यक्ष रश्मी क्षीरसागर, उपाध्यक्ष रेश्मा शेख, उपाध्यक्ष कौस्तुभ उबाळे, सोशल मीडिया अध्यक्ष हर्षद ओस्तवाल, रोहित जाधव, अक्षय मरकळ उपस्थित होते.