पंतप्रधान नाही पण विको वज्रदांतीचे ब्रँड ॲम्बेसडर मात्र नक्की होतील; अतुल भातखळकर यांची राहुल गांधींवर टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०५ ऑक्टोबर २०२२


काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ‘भारत जोडो यात्रे’ला तामिळनाडून सुरुवात झाली. ती आता केरळमधून कर्नाटकमध्ये पोहचली आहे. या यात्रेतील एका फोटोवरून भाजपाने राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

कर्नाटकातील पदयात्रेत राहुल गांधी यांचा ऊस खात असतानाचा फोटो व्हायरल झाला होता. यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणाले, “राहुल गांधी पंतप्रधान झाले नाहीत, होणारही नाहीत. पण विको वज्रदंतीचे ब्रँड ॲम्बेसडर नक्की होतील,” अशी टिका अतुल भातखळकर यांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *