पिंपरी चिंचवड उपमहापौरपदी भाजपच्या नगरसेविका हिराबाई उर्फ ​​नानी घुले बिनविरोध विराजमान…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी: दि २३ मार्च २०२१
आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपमहापौरपदी भाजपच्या नगरसेविका हिराबाई उर्फ ​​नानी घुले यांची बिनविरोध निवड झाली.
राष्ट्रवादीचे नगरसेवक पंकज भालेकर हे उमेदवार होते.पुणे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली उपमहापौर निवडीसाठी आयोजित सर्व साधारण सभेच्या विशेष बैठकीचे अध्यक्ष होते.


अर्ज भरण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी देण्यात आला. या कालावधीची मुदत संपण्यापूर्वी सकाळी 11.26 मिनिटाने पंकज भालेकर यांनी विरोधी पक्षनेते राजु मिसाळ यांच्या समवेत जाऊन रुबल अगरवाल यांचेकडे पत्र देऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला. परिणामी घुले नानी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली .
भाजपचे नगरसेवक ,नगरसेविका मराठमोळे फेटे परिधान करून सभागृहात प्रवेश केला.
विनामस्क असलेल्या नगरसेवक नागरसेविकांची संख्या लक्षणीय होती. आता कुठे गेला कोरोना ? अशी चर्चा महानगरपालिका वर्तुळात चांगलीच रंगली.

यावेळीआयुक्त राजेश पाटील ,अतिरीक्त आयुक्त विकास ढाकणे,प्रभारी सल्लागार चंद्रकांत ईंदलकर,नगर सचिव उल्लास जगताप, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *