दिव्यांग व निराधारां सोबत युवक काँग्रेसचा व्हॅलेन्टाईन डे साजरा… शहर युवक काँग्रेसचा स्नेह सोहळा अनोखा उपक्रम

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी दि. १४ फेब्रुवारी २०२१
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस कडून व्हॅलेन्टाईन डे अनोख्या पद्धतीने दिव्यांग व निराधारां समवेत स्नेह सोहळ्या द्वारे प्रेम दिवस साजरा करण्यात आला.
आज मामुर्डी येथील माई बालभवन या दिव्यांग निराधारांचे संगोपन करणा-या संस्थेत स्नेह सोहळ्या अंतर्गत मिठाई, भेटवस्तू, जूने कपडे व चेक स्वरूपात देणगी देण्यात आली.

माई बाल भवन येथे ०५ ते ३५ वयोगटातील सुमारे ४५ मुले-मुली राहतात या मध्ये अंध, अपंग,निराधार,एड्सग्रस्त विविध अत्याचारांना बळी पडलेले पीडित राहतात.

या प्रसंगी बोलताना युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, आजचा दिवस हा प्रेम दिन म्हणून जगाभरात साजरा केला जातो व आजच्या दिवशी आपल्या मनांत ज्यांच्या विषयी प्रेम आहे अशा व्यक्तींना शुभेच्छा व भेटवस्तू दिल्या जातात.
आमच्या मनात समाजातील उपेक्षित, निराधार व दिव्यांग बांधवाप्रती प्रेम,संवेदना व सदभावना आहेत व याच भावनेतून हा स्नेहसोहळा आयोजित करण्यात आला आहे. यातून समाजातील अनेक युवका पर्यंत हा गरजुंप्रती सेवेचा व समर्पणाचा संदेश दिला जावा व यातून सक्षम व उपेक्षित यांच्या मध्ये व्हॅलेन्टाईन रिलेशनशिप (प्रेमाचे नाते) निर्माण व्हावे हा या उपक्रमचा मुख्य उद्देश असल्याचे, बनसोडे यांनी सांगितले.

याप्रसंगी संस्थेच्या संचालिका मा.प्रतिज्ञा माई देशपांडे मॅडम व मधुकर इंगळे सर यांनी उपक्रमाचे कैतुक केले.
संस्थेस नवी जागा व क्रीडा साहित्य आवश्यक असल्या बद्दल ची माहिती दिली व मदतीबाबत आभार मानले.

याप्रसंगी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे ,शहर सरचिटणीस राहुल काळभोर ,विशाल सरोदे, मिलिंद बनसोडे ,पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष हिराचंद जाधव, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष सौरभ शिंदे, अर्णव कामठे, तेजस पाटील,ओंकार पवार, प्रवीण जाधव,आकाश जाधव,राकेश सपांगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.