खामुंडीच्या धर्मनाथ दर्शनाला भाविकांची तुरळक गर्दी…बैल गाडा शर्यत बंदी मुळे घाटात शुकशुकाट

  • सर्वत्र एकच चर्चा बैलगाडा शर्यत बंदी उठणार का ?

प्रतिनिधी-कैलास बोडके

खामुंडी (ता. जुन्नर) येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्या धर्मनाथ देवस्थान यात्रे निमित्त यंदा भाविकांची तुरळक गर्दी निदर्शनास आली.
दरवर्षी यात्रेला जुन्नर, खेड,आंबेगाव,पारनेर,अकोले,मुरबाड आदी तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते परंतु वर्षानूवर्ष चालत आलेली बैल गाड़ा शर्यतींची परंपरा यावर्षी कायद्याने बंद असल्यामुळे व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील बैलगाडा शर्यती च्या घाटातही पूर्णपणे शुकशुकाट होता. बैलगाडा शर्यतबंदीचा मोठा आर्थिक फटका वडापाव,भेळ,आईस्क्रीम,रसवंती गृह,पाणी व खेळणी विक्रेते या छोट्या व्यावसायिकांना बसल्यामुळे व बैलगाडा शर्यत बंदीमुळे जन सामन्यांमध्ये तीव्र स्वरूपाच्या संतापी प्रतिक्रिया उमटत होत्या.

या बाबत सविस्तर माहीती देताना काळभैरव नाथ ट्रस्ट चे अध्यक्ष मारुती बाबुराव शिंगोटे आणि सचिव संदीप पांडुरंग गंभीर यांनी माहीती दिली की, दर वर्षी माघ महिन्यात येणारी ही धर्म नाथ देवस्थान यात्रा म्हणजे बैलगाडा शर्यतीचे जुन्नर तालुक्यातील एक आगळे वेगळे आकर्षण असायचे बैल गाडा शर्यती साठी शेकडो गाडा मालक या स्थानावर हजेरी लावत असत तितक्याच पटीत हज़ारोंच्या संख्येने भावीकभक्त,प्रेक्षक वर्ग बैल गाडा शर्यत पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजेरी लावत होते .परंतु सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या बैल गाडा शर्यत बंदी मुळे यावर्षी निराशा होऊन यात्रेत मोठा शुक शुकाट पहायला मिळाला . देवदर्शनाच्या निमित्ताने जमलेल्या भाविकांमध्ये यावेळी एकच चर्चा आढळून आली ती म्हणजे बैल गाडा शर्यती वरील बंदी उठनार कधी? आणि यात्रेचा पुन्हा आनंद कधी घेता येणार? खामुंड़ी गावचे नवनिर्वाचित सरपंच वनराज शिंगोटे उपसरपंच विश्रांती बोडके यांचे हस्ते धर्मनाथाची विधिवत पूजा व अभिषेक करण्यात आला त्यानंतर दिवसभर सहकुटुंब सहपरिवार बैलगाडीत बसण्याचा आनंद घेत भाविक धर्मनाथ दर्शनासाठी येत होते. जनसेवा ग्रुपच्यावतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान ग्रा.पं. सदस्य दशरथ जगताप ,सत्यवान डुंबरे,दीपाली ì