मनसेच्या या काळ्या झेंड्यांना आम्ही गुलाबाच्या फुलानं उत्तर देऊ – नाना पटोले

१८ नोव्हेंबर २०२२


काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची शेगावमध्ये आज सभा होणार आहे. ही सभा उधळून लावण्याचा इशारा मनसेने दिला आहे. राहुल गांधींनी सावरकरांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ मनसेकडून या सभेत काळे झेंडे दाखवण्यात येणार आहे. मनसेच्या या काळ्या झेंड्यांना आम्ही गुलाबाच्या फुलानं उत्तर देऊ, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

राहुल गांधींनी सावरकरांविषयी मांडलेल्या भूमिकेव्यतिरिक्त काही वेगळी माहिती मनसेकडे असल्यास त्यांनी ती मांडावी. हा वैचारिक महाराष्ट्र आहे. काँग्रेसची ही विचारांची यात्रा आहे. ही यात्रा आता जनतेची झाली असून या यात्रेला विरोध करायचा असल्यास मनसेनं तो करावा, असंही पटोले म्हणाले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *