उद्धव ठाकरेंना शिवसेनेतील बंड थोपवण्यात अपयश आलं, त्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवे होते – रोहित पवार

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१९ ऑक्टोबर २०२२


एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंड केल्यानं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. या बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागलं. बंडखोर आमदारांशी परत येण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. मात्र, आमदारांनी भाजपाबरोबर जात सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरे हे बंड थोपवण्यात अपयशी ठरले का? यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी भाष्य केलं आहे.

रोहित पवार म्हणाले की, शिवसेनेत आमदार फुटल्यानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना पक्षातील बंड थोपवण्यात अपयश आलं. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवे होते. बंड करण्याची तयारी एक, दोन महिन्यापूर्वी नाहीतर, एक ते दीड वर्षापासून सुरु होती. याची जाणीव सर्वांना होती. पण, बंडखोरीनंतर १० ते ११ आमदार फुटतील, असे वाटलं होतं. उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांना भेटू शकलो नाही. अन्यथा मी आदित्य आणि उद्धव ठाकरेंना भेटून बैठका करत होतो. नुकतेच एका मंत्र्याला कामानिमित्त भेटण्यास गेलो होते. तेव्हा त्यांच्या कार्यालयाबाहेर २० आमदार उभे राहिले होते. ते पाहून पूर्वीची राजकीय स्थिती चांगली होती, असे रोहित पवारांनी म्हटलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *