सिक्कीममध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाला मोठा अपघात, १६ जवानांचा मृत्यू

२३ डिसेंबर २०२२


सिक्कीममध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. नॉर्थ सिक्कीममध्ये भारतीय लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने १६ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर, या घटनेत चार जवान जखमी झाले आहे. घटनास्थळावर लष्कराकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. सकाळच्या सुमारास लष्कराच्या तीन गाड्या जवानांना घेऊन चट्टेनहून थांगूच्या दिशेने निघाले होते. झेमा येथे वळणावर मोठा उतारा होता. तेव्हा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जवानांची बस दरीत कोसळली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. नॉर्थ सिक्कीममध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांच्या जीवितहानीमुळे खूप दुःख झाले आहे.जवानांच्या सेवेबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल देश मनापासून कृतज्ञ आहे. शोकग्रस्त कुटुंबियांना माझ्या संवेदना. जखमी जवान लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो, असं संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *