(बातमी प्रतिनिधी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक)
संपूर्ण जगासह भारतावर आलेल्या कोरोनाच्या भयानक परिस्थितीवर मात केलेल्या, व कोरोनाला नष्ट करण्यासाठी ज्या व्यक्तींनी आपल्या जीवाची पर्वा न करता, आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून सामान्यातील सामान्य नागरिकांना उत्तम सेवा दिल्या. त्यात वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी, सफाई कर्मचारी, संरक्षण करणारे कर्मचारी आदींचा समावेश होतो. आपल्याला दिलेली जबाबदारी पार पाडणाऱ्या खऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान हा गौरव चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन करण्यात आला.
यावेळी तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. बी. मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे, शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटिल, लहुजी शक्ती सेनेचे उपजिल्हाध्यक्ष संजय फाजगे, शी. न. पा. चे मुख्याधिकारी महेश रोकडे आदींचा सन्मान करण्यात आला.
यावेळी, तुकाराम खोले (मा. सभापती, शी. न. पा. शिक्षक मंडळ) संतोष शितोळे, नगरसेवक व वंचित बहुजन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव, दादाभाऊ लोखंडे, भाजपाचे झोपडपट्टी सेलचे शहराध्यक्ष सतीश घोलप, मनसे तालुका अध्यक्ष ऍड. स्वप्निल माळवे, उद्योजक योगेश जामदार, राजु नेवासकर अनेक मान्यवर उपस्थित होते.
विशाल (बंटी) जोगदंड अध्यक्ष लहुजी शक्ती सेना शिरुर, कृष्णा पुरवे, सागर पंडित, अविनाश साबळे, किरण पवार, आकाश पवार, बाबु माने, फैयाज शेख आदींनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले.
कोरोना प्रतिबंधात्मक लस मी आज स्वत:घेतली आहे. त्यानंतर मला कोणताही त्रास होत नसून ही लस सुरक्षित आहे अशी प्रतिक्रिया श्रावण हर्डीकर यांनी दिली.
रोहित खर्गेविभागीय संपादक पिंपरी: दि १० फेब्रुवारी २०२१पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयामध्ये आयुक्त हर्डीकर यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात…